‘भीमा कोरेगांव हिंसाचार प्रकरणात फडणवीस सरकार जबाबदार’, शरद पवारांचा गंभीर आरोप 

मुंबई | कोरेगाव भिमा हिंसाचार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. सदर घटनेच्या चौकशी आयोगाकडून शरद पवारांना विविध प्रश्न विचारण्यात आले.

जर शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू असेल तर आणि असामाजिक घटक तिथे येऊन अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतील तर जबाबदारी कोणाची आहे?, असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला होता.

कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. असामाजिक घटकांनी राज्याची शांतता भंग करू नये याकरिता पोलिसांनी सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करणे आवश्यक आहे, असं शरद पवारांनी उत्तर दिलं आहे.

भिमा कोरेगाव हिंसाचाराला भाजप सरकार जबाबदार आहे. हिंसा नियंत्रणात करता आली असती. परंतु, तसे केले गेले नाही, असा गंभीर आरोप शरद पवारांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे.

राजकीय शक्तीच्या अभावामुळे हिंसाचार झाला. भाजप सरकारने वेळीच उपाययोजना केल्या नाहीत, असं शरद पवारांनी म्हटलं आहे.

कोरेगांव भीमा हिंसाचाराची चौकशी करण्याकरिता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रकाश आंबेडकर यांना आयोगाने बोलावायला हवे का?, असाही प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला.

आयोग स्वत:हून तपास करण्यासाठी सक्षम आहे. भविष्यामध्ये अशा प्रकारची दंगलसदृश परिस्थिती टाळण्यासाठी जर काही सुचना मिळू शकतात असे आयोगाला वाटत असेल तर ते कोणालाही बोलावू शकतात, असं शरद पवार म्हणाले आहेत.

दरम्यान, संभीजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना कधी भेटलो नाही. त्यांची व्यक्तीश: ओळख नसल्याचं शरद पवारांनी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

…म्हणून तुरुंगातून बाहेर येताच नवनीत राणा लिलावती रूग्णालयात दाखल

“राज ठाकरेंना अयोध्येत येऊ देणार नाही”; भाजप खासदार आक्रमक

“काय अल्टिमेटम द्यायचा तो घरातल्यांना द्या”; अजित पवारांनी राज ठाकरेंना फटकारलं

मोदी सरकारचा आणखी एक मोठा निर्णय, एअर इंडियानंतर ‘ही’ कंपनीही विकली

मोठी बातमी! कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी अत्यंत महत्वाची माहिती समोर