शरद पवारांनी केलेल्या ‘या’ गोष्टीमुळे राजकारणात चुकीचा पायंडा पडला- बाळासाहेब विखे

मुंबई | नुकतंच बाळासाहेब विखे पाटील यांनी शब्दबद्ध केलेल्या ‘देह वेचावा कारणी’ या आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा पार पडला. या सोहळ्याला व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह इतरही काही मान्यवर उपस्थित होते. बाळासाहेब विखे पाटील यांनी या आत्मचरित्रात महाराष्ट्राच्या राजकारणातील बऱ्याच महत्वाच्या गोष्टींचा उलघडा केला आहे.

बाळासाहेब विखे पाटील यांनी या आत्मचरित्रात शरद पवारांवर देखील भाष्य केल आहे. महाराष्ट्रात सत्तेसाठी आणि सत्तेपुरतं राजकारण करायला शरद पवार यांनी सुरुवात केली, असा आरोप बाळासाहेब विखे पाटील यांनी आपल्या आत्मचरित्रात केला आहे.

तसेच महाराष्ट्रात व्यक्तिगत राजकीय बळ आणि महत्त्वकांक्षेला शरद पवार यांच्यामुळेच महत्वं आलं, असाही आरोप बाळासाहेब यांनी देह वेचावा कारणी यामध्ये केला आहे. बाळासाहेब विखे पाटील यांनी या आत्मचरित्रात शरद पवारांबरोबरच वसंत दादा पाटील, पुलोद सरकार आणि इतरही काही महत्वाच्या राजकीय नेत्यांवर विस्तृत भाष्य केलं आहे.

शरद पवारांनी पुलोदचा प्रयोग करुन मुख्यमंत्रिपद मिळवलं. मात्र त्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणानं सर्वार्थानं घातक वळण घेतलं. पक्षापेक्षा व्यक्तीगत राजकीय बळ आणि महत्त्वाकांक्षेला महत्त्व पवारांनी केलेल्या कृत्यामुळेचं आलं, असंही बाळासाहेब विखे पाटील यांनी आपल्या आत्मचरित्रात लिहिले आहे.

शरद पवार सत्तेसाठी मित्र आणि शत्रू बदलत राहिले. परंपरागत विरोधी पक्षाऐवजी मुळच्या कॉंग्रेसच्या गटामध्येच संघर्षाचं, स्पर्धेचं राजकारण वाढीला लागलं, असंही बाळासाहेब यांनी आपल्या आत्मचरित्रात म्हटलं आहे.

खरतर शरद पवारांना महाराष्ट्राच्या प्रश्नांची आतिशय चांगली समज आहे. शरद पवार मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांच्याकडून अपेक्षा उंचावल्या होत्या. राज्याच्या राजकारणाला, समाजकारणाला विधायक वळण देवून विकासकामांची गती वाढवण्याची त्यांची क्षमता होती आणि आहे. परंतु त्यांच्यातील राजकारण्यानं त्यांच्या स्वभावानं व वागण्यानं या सगळ्यावर मात केली, असंही बाळासाहेब यांनी लिहिलं आहे.

दरम्यान, बाळासाहेब विखे पाटील हे विठ्ठलराव विखे पाटील यांचे चिरंजीव आहेत. विठ्ठलराव विखे पाटील यांना आशियातील सहकारी क्षेत्रातील प्रथम साखर कारखाना उभारण्याचं श्रेय दिलं जातं.

पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील यांनी शेती, शिक्षण आणि सहकार क्षेत्रात संपूर्ण देशाला आपल्या विचारातून निर्णय प्रक्रियेची प्रेरणा दिली आहे. बाळासाहेब विखे पाटील यांचा जन्म 10 एप्रिल 1932 रोजी झाला. बाळासाहेब यांनी अनेकवेळा लोकसभेचा सदस्य म्हणून देखील काम पाहिलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

सुशांत प्रकरणी ‘हा’ बडा निर्माता ईडीच्या रडारवर; ईडीनं छापा टाकत केली मोठी कारवाई

शरद पवारांनी दिलेली ‘ती’ माहिती असत्य; बाळासाहेब विखे-पाटलांच्या पुस्तकात धक्कादायक गौप्यस्फोट

राष्ट्रवादी कॉंग्रेस राजू शेट्टींना दिलेलं ‘ते’ वचन पाळणार का?

कंगना राणावतला अ.टक होणार? न्यायालयानं ‘त्या’ प्रकरणी दिला महत्वाचा आदेश

धोनीची दादागिरी आता इतकी वाढलीय का?; त्याच्या धाकानं अंपायरनं चक्क निर्णय बदलला!