दिल्लीत जाणाऱ्या उदयनराजेंना गल्लीत ‘चेकमेट’ करण्याची खेळी?

सातारा| राज्यसभेवर उदयनराजेंची वर्णी लागणार हे जवळपास निश्चित झालय, पण उदयनराजेंना साताऱ्यातच चेकमेट करण्याची खेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून आखली जात असल्याची माहिती मिळतीय.

शशिकांत शिंदेचा चेहरा पुढे करून साताऱ्यात राजेंना शह देण्याची खेळी राष्ट्रवादीकडून खेळली जातीय. सध्या राजेंची बालेकिल्यात झालेली ढिली पकड ही राष्ट्रवादी काँग्रेससाठी नामी संधी आहे.

शिंदेना मंत्रीपद देवून स्थानिक स्वराज्य संस्थेत राजेंची कोंडी करता येवू शकते अशी रणनीती आखली जात आहे. कोरेगाव विधानसभा मतदारसंघात सातारा तालुक्याचा काही भाग येतो मागच्या निवडणुकीत उदयनराजे भोसलेंनी शिंदेच्या विरोधात रान उठवलं होतं त्यातून शिंदेंना पराभवाला सामोर जाव लागलं होतं.

आता त्याच पराभवाचा वचपा काढण्याची संधी शिंदे शोधतायत, त्यामुळेच राजेंना शह देण्यासाठी शिंदेंसारख्या सरदाराला बळ देण्याची रणनीती आखण्यात आलीय.

महत्वाच्या बातम्या- 

-सुप्रिया सुळेेंच कौतुक करताना नाथाभाऊ म्हणतात…

-कोरोना पसरतोय जगभरात; महाराष्ट्रातील 600 यात्रेकरु अडकले इराणमध्ये

-खटला चालवण्यास केजरीवाल सरकारने मंजुरी दिल्यानंतर कन्हैया कुमारची पहिली प्रतिक्रिया म्हणतो; …

-“केंद्र सरकारने ओबीसींची स्वतंत्रपणे जनगणना करण्याचा ठराव फेटाळला”

-ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; तब्बल 1 लाख 1 हजार पदांची होणार मेगाभरती