धक्कादायक, सुशांतसिंग राजपुतच्या नावाने सुसाईट नोट लिहून ‘ती’ने केली आत्महत्त्या !

रायपूर | बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्यूमुळे चित्रपटसृष्टी समवेत त्याच्या चाहत्यांमध्येही शोककळा पसरली आहे. परंतु सुशांतसिंग राजपुतच्या मृत्यूचे दुःख सहन न झाल्याने तेरा वर्षांच्या मुलीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना छत्तीसगढ मधील दुर्ग जिल्ह्यात घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही मुलगी कुटुंबियांप्रमाणेच सुशांतसिंग राजपुतची खूप मोठी फॅन होती. ती सुशांतची गाणी व व्हिडिओ सतत पाहत असायची. सुशांतसिंग राजपुतच्या मृत्यूची वार्ता ऐकून ती खूप दुःखी होती. त्यामुळे तिने बुधवारी गच्चीवर गळफास घेऊन आत्महत्या केली.

ही मुलगी आठवीत शिकत होती. बुधवारी मुलीने आत्महत्या केली तेव्हा तिचे पालक घरी नव्हते. तिचे पालक घरी आले तेव्हा त्यांना दार आतून कुलूपबंद असल्याचे आढळलं. वडिलांनी मागून घरात प्रवेश केला तर त्यांना गच्चीवर मुलगी लटकलेली दिसली. यावेळी मुलीने सुशांतसिंग राजपुतच्या नावे लिहिलेली सुसाईट नोट ही त्यांना मिळाली.

भिलाईनगर पोलीसांनी सांगितले की, या प्रकरणाबाबत पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

राष्ट्रवादीच्या ‘या’ महिला खासदारालाही कोरोनाची लागण

इतिहास तुम्हाला कधीही माफ करणार नाही; गेहलोत यांचे मोदींना पत्र

पोटच्या मुलानं नाकारलं अन् सख्ख्या भावानं सोडलं; ‘ती’ स्मशानात एकटीच जळत राहिली!

उपचारासाठी बेड मिळावं म्हणून आठ तास आंदोलन करणाऱ्या युवकाचा अखेर मृत्यू

खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर सभापती भडकले; ‘या’ कृत्यामुळे दिली समज!