शिंदे सरकारचा सर्वसामान्यांना मोठा दिलासा; राज्यात मध्यरात्रीपासून पेट्रोल-डिझेल ‘इतक्या’ रूपयांनी स्वस्त

मुंबई | शिंदे सरकारने सर्वसामान्यांना मोठा दिलासा आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात पेट्रोलवरील करात 5 रुपये आणि डिझेलवरील करामध्ये 3 रुपयांनी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता राज्यातील पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे 5 आणि 3 रुपयंनी कमी होणार आहेत.

महागाईने त्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. पेट्रोल डिझेलचे दर कमी झाल्याने इतर वस्तूंचे दर कमी होण्यासही येत्या काळात मदत होईल.

केंद्र सरकारने एक्साईज ड्युटी कमी केल्यानंतर राज्य सरकारने व्हॅट कमी करावा अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व राज्यांना केली होती.

अनेक राज्यांनी पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर व्हॅट कमी केला होता. मात्र महाराष्ट्रात याबाबत निर्णय घेण्यात आला नव्हता. मात्र शिंदे सरकारने हा निर्णय घेऊन सामान्यांना मोठा दिलासा दिलाय.

दरम्यान,  या बैठकीत नऊ मोठे निर्णय घेण्यात आले. पेट्रोल डिझेल दर कपात, नगराध्यक्ष, सरपंच थेट निवड यासह नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचं अनुदान यासारखे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली.

राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय आज घेतला आहे. जे शेतकरी नियमित कर्ज फेड करतात त्यांना 50 हजार रुपयांचा अनुदान देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या-  

“…पण फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणजे सरकार नव्हे” 

शरद पवार अॅक्शन मोडमध्ये, कार्यकर्त्यांना दिल्या ‘या’ महत्त्वाच्या सूचना

शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात अमित ठाकरेंना संधी?, भाजपची मनसेला स्पेशल ऑफर

एकनाथ शिंदेचा उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का, आमदारांपाठोपाठ खासदारही फुटणार?

“देर है अंधेर नही, उद्धव ठाकरेंनाच मुख्यमंत्री करण्याची वेळ राज्यपालांवर येणार”