…तर आम्ही एनडीएतून बाहेर पडू, या पक्षाने दिला इशारा

नवी दिल्ली |  अनेक वर्षांपासून एनडीएसोबत असलेल्या शिरोमणी अकाल दलाने एनडीएला सोडचिठ्ठी देण्याचा इशारा दिला आहे. शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंह बादल यांनी इंधन दरवाढ आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून एनडीएला हा इशारा दिला आहे.

महाराष्ट्रात सरकार स्थापन करतावेळी शिवसेनेने एनडीएची साथ सोडली. त्यानंतर आता एनडीएचा जुना मित्रपक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दलाने देखील एनडीएला साथ सोडण्याचा इशारा दिल्यानंतर एनडीएमध्ये काहीशी अस्वस्थता वाढली आहे.

शेतकऱ्यांपेक्षा आणि जनतेपेक्षा मंत्रिपद आणि आघाडी ही आमच्यासाठी महत्त्वाची नाही. आम्ही मंत्रिपद आणि आघाडीचा त्याग करू शकतो, असं पक्षाचे नेते असं सुखबीर सिंह बादल म्हणाले आहेत.

पंजाबमधलं काँग्रसचं सरकार डिझेलवरील दहा रुपये किंमत कमी करण्यास तयार असेल, तर पंजाबमधील सर्व राजकीय पक्षांसह दिल्लीत केंद्र सरकारच्या निषेधार्थ आंदोलनाला बसण्यास आम्ही तयार आहेत, असं सुखबीर सिंह बादल म्हणाले आहेत.

डिझेलच्या दरातील वाढीचा त्यांच्यावर मोठा परिणाम होईल, म्हणून केंद्र सरकारने या विषयावर गांभीर्याने विचार करायला हवा, असा सल्ला देखील त्यांनी केंद्र सरकारला दिला. दरम्यान, पेट्रोल डिझेलच्या किमती गेले 19 दिवस न चुकता वाढत आहेत. पेट्रोल डिझेलच्या किमतींचा भडका दररोज उडतो आहे. इतिसाहात पहिल्यांदाच पेट्रोलच्या किमतीपेक्षा डिझेलच्या किंमत महाग झाली आहे.

 

-“….नाही तर गोपीचंद पडळकरांना काळे फासणार”

-शरद पवारांवरील जहरी टीका भोवण्याची शक्यता; पडळकरांवर कारवाईचा इशारा