“शिवसेनेनं कधीही मुस्लिमांना विरोध केला नाही, ते आमच्या हिंदुत्वाच्या व्याख्येत”

औरंगाबाद | अभिनेत्री कंगना रणौत नेहमीच काहीना काही वादग्रस्त विधान करत असते. त्यामुळे आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे ती नेहमीच चर्चेत असते. अशातच तिनं काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात देशाच्या स्वातंत्र्याविषयी एक वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यानंतर देशभरात एकच खळबळ पहायला मिळत आहे.

कंगनाच्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ माजली असतानाच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेत घेत अनेक विषयांवर चर्चा केली आहे. यावेळी त्यांनी मुस्लीमांना विरोध करण्याविषयी मोठं वक्तव्य केलं आहे.

औरंगाबादमध्ये देशात वाढत चाललेल्या महागाईचा निषेध करण्यासाठी मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. शिवसेनेकडून काढण्यात आलेल्या मोर्चाचं नेतृत्व संजय राऊत यांनी केलं. शिवसेनेनं कधीच मुस्लिमांना ठरवून विरोध केला नाही, ते आमच्या हिंदुत्वाच्या व्याख्येतच येतात, असं संजय राऊत यांनी म्हटलं.

शिवसेनेनं हिंदुत्वाचा विचार आणि आधार कधीही सोडलेला नाही. आमच्या हिंदुत्वाच्या व्याख्येमध्ये सर्व जातीधर्मांना स्थान आहे. हिंदुत्व हेच आमचं राष्ट्रीयत्व आहे. त्यामुळे जे या राष्ट्राला आणि मातृभूमीला मानतात, ते आमच्या हिंदुत्वाच्या व्याख्येत बसतात, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं.

संजय राऊत यांनी यावेळी महाविकास आघाडी सरकारविषयीही बोलले. शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे सरकारमध्ये एकच असल्याचं राऊत यांनी म्हटलं. राज्याचा कुठलाही निर्णय तिन्ही पक्ष एकत्रच मिळून घेणार, असंही त्यांनी म्हटलं.

नुकतच कंगना रणौतला पाठिंबा देणाऱ्या भाजपवर आता शिवसेनेनं आगपाखड सुरू केली आहे. सामनामधील अग्रलेखातून शिवसेनेनं कंगना रणौतच्या या विधानाचा समाचार घेत भाजपावर देखील निशाणा साधला आहे.

कंगना रणौतला देण्यात आलेले सर्व राष्ट्रीय पुरस्कार परत घेतले पाहिजेत, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या कंगनावर टीकास्त्र सोडले जात आहेत.

दरम्यान, भाजपला स्वांतत्र्यसैनिकांच्या बलिदानाची थोडी जरी चाड असेल तर तर त्यांनी कंगणाला दिलेले पुरस्कार माघारी घ्यावेत, असा घणाघातही सामनातून केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –  

  “महाराष्ट्रात दंगली करणाऱ्या रझा अकादमीवर बंदी घाला, अन्यथा…”

“आपण कॅशलेस नाही तर लेसकॅश अर्थव्यवस्था झालोत” 

“एक आण्याची भांग घेतली तर भरपूर कल्पना सूचतात” 

पोस्ट ऑफिसमध्ये खातं उघडणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 

“कोण नितेश राणे? त्यांच्या आरोपांना आम्ही मोजत नाही”