भाजपच्या मदतीने काँग्रेस-राष्ट्रवादीला गड राखण्यात यश, पण…; या निकालाची राज्यभर चर्चा

कोल्हापूर | कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर (Kolhapur District Central Co-operative Bank Election 2022) काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांची सत्ता होती. मात्र, जागावाटपाची चर्चा फिसकटली आणि शिवसेनेने स्वतंत्र आघाडी उघडली होती.

भाजपने सत्तारूढ गटाबरोबर म्हणजेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत राहणं पसंत केलं होतं. अशातच आता कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीचा निकाल लागला आहे.

या निवडणुकीत तिन्ही पक्षांनी कडवी झुंज दिली. असं असलं तरी अखेर राष्ट्रवादीने आपला गड राखला आहे. तर शिवसेना किंगमेकरच्या भूमिकेत आली आहे.

15 जागांपैकी सत्ताधारी गटाला 8 जागा जिंकता आल्या आहेत. तर विरोधी गटाला आतापर्यंत 6 जागा मिळाल्या आहेत. शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जोरदार टक्कर दिल्याचं पहायला मिळालं आहे.

खासदार संजय मांडलिक आणि आमदार संपतराव पवार यांच्या नेतृत्वाखाली विरोधी गटाने ही निवडणूक झाली. आता अध्यक्षपद हे शिवसेना ठरवणार असल्याचं चित्र दिसत आहे.

अध्यक्षपदावर आता शिवसेनेचं बोट असल्याने आता राष्ट्रवादीचे दिग्गज नेते हसन मुश्रिफ यांना मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.

दरम्यान, आता या निवडणुकीवरून महाविकास आघाडीमध्ये वादाची ठिगणी पडणार की काय?, असा सवाल आता राजकीय वर्तुळात देखील उपस्थित केला जातोय.

महत्वाच्या बातम्या –

‘डान्सिंग डॉल’च्या उल्लेखावर अमृता फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाल्या…

प्रेक्षकांसाठी खुशखबर! सुपरहिट पुष्पा सिनेमा आजपासून टीव्हीवर पाहता येणार

पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार?, नारायण राणे म्हणाले…

पालकांनो लक्ष द्या! लस घेतल्यावर लहान मुलांमध्ये दिसतात ‘हे’ दुष्परिणाम

‘कपिल शर्मा शो’मधील ‘या’ कलाकाराचा आत्महत्येचा प्रयत्न, हे धक्कादायक कारण आलं समोर