“उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावर बसण्याचा अधिकार नाही”

मुंबई | अवघ्या महाराष्ट्राचं दैवत असलेल्या छ. शिवाजी महाराजांच्या शिवजयंतीची 19 तारीख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मान्य नसेल तर त्यांना मुख्यमंत्रीपदावर बसण्याचा अधिकार नसल्याचं शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी म्हटलं आहे.

निवडणुकीत लोकांना आश्वासन द्यायचे आणि दुसरीकडे त्याकडे लक्षही द्यायचं नाही असा प्रकार या सरकारने चालवला आहे. त्यामुळे दोन भूमिका घेणार हे सरकार पडले पाहिजे आणि समाजाला न्याय मिळाला पाहिज. यासाठी आपल्याला काम करायचं असल्याचं मेटे यांनी म्हटलं आहे.

शिवसंग्राम पक्षाच्या 18 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने शिवजयंतीच्या तारखेच्या मुद्यावरून मेटेंनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांची दुटप्पी भूमिका या महाराष्ट्रात चालू देणार नसल्याचंही मेटे यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या- 

-“थोड्या दिवसांनी अजित पवारच शिवसेना चालवताना दिसतील”

-मी नाराज नाही; मी माझे मुद्दे मुख्यमंत्र्याकडे मांडले आहेत- तानाजी सावंत

-हिंदूस्थानची अवस्था पाकिस्तानसारखी झाली नाही, ते फक्त गांधी, नेहरु आणि पटेलांमुळेच- संजय राऊत

-महात्मा गांधींच्या तोडीचा नेता स्वातंत्र्य चळवळीत झाला नाही म्हणूनच…- संजय राऊत

-“चांगल्या कार्यक्रमासाठी माझ्या ट्रान्सपोर्टच्या गाड्या कुणी वापरत असेल तर माझी हरकत नाही”