शॅडोवाल्यांचं मुख्यमंत्रिपद रिकामंच; ‘सामना’तून मनसेवर बोचरी टीका

मुंबई | राज्य सरकारच्या कामावर करडी नजर ठेवण्यासाठी मनसेने शॅडो कॅबिनेटची घोषणा केली. शिवसेने मनसेच्या या शॅडो कॅबिनेटवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधून जोरदार टीका केली आहे.

‘शॅडो’ची घोषणा करताना त्यांच्या प्रमुख नेत्यांना छाया मंत्रिमंडळास तंबी द्यावी लागली की “जपून करा, ब्लॅकमेल करण्याचे प्रकार करु नका”. हे बरे झाले. पुन्हा शॅडो वाल्यांचे मुख्यमंत्रिपद रिकामेच आहे. शॅडो कॅबिनेटमध्ये शपथ देण्यासाठी एखादा शॅडो राज्यपाल नेमला असता तर योग्य ठरलं असतं, असं सामनामध्ये म्हटलं आहे.

महाराष्ट्रातील किंवा देशातील विरोधी पक्षाची स्थिती पाहता शॅडो कॅबिनेटचा प्रयोग म्हणजे ‘हा खेळ सावल्यांचा’ नाट्यप्रयोग आहे. म्हणजे खेळ सावल्यांचा अधिकच रंगतदार झाला असता. महाराष्ट्रात विनोद शिल्लक आहे. राजकाराणात विनोदाला वावडं नाही हे पुन्हा दिसलं, अशा सामनामधून शॅडो कॅबिनेटची खिल्ली उडवली आहे.

दरम्यान, लोकसभेत अधिकृत विरोधी पक्षनेताच नाही आणि राज्यातला विरोधी पक्ष अद्याप बादशाही भूमिकेतून बाहेर पडला नाही, असंही सामनामध्ये म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-कोरोनाची पालकांनी घेतली धास्ती; शाळांबाबत जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा खुलासा

-#Corornaच्या पार्श्वभूमीवर महापौरांचं पुणेकरांना आवाहन

-“कर्नाटक, मध्यप्रदेश नंतर महाराष्ट्रातही राजकीय भूकंप”

-#Corona पुण्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 5; आरोग्यमंत्र्यांची माहिती

-कोरोनाच्या भीतीने आईचा जीव कासावीस; मुलाला केलेला कॉल व्हायरल…