“उलट्या वरातीत नाचणाऱ्या भाजपच्या ‘वऱ्हाडी’ मंडळींनी ‘हे’ लक्षात ठेवलेलं बरं”

मुंबई | ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केल्याने मध्यप्रदेश सरकार धोक्यात आलं आहे. त्यानंतर महाराष्ट्रातलंही सरकार लवकरच पडणार असा दावा काही नेत्यांकडून करण्यात आला होता. मात्र महाविकास आघाडी सरकार अभेद्य असून उलट्या वरातीत नाचणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावं, अशी टीका शिवसेनेनं केली आहे.

काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात जे ‘न भूतो’ असे अनपेक्षित राजकीय नाट्य घडलं तसा एखादा धक्कादायक प्रयोग मध्य प्रदेशातही घडू शकतो. हे मध्य प्रदेशातील उलट्या वरातीत नाचणाऱ्या भाजपच्या ‘वऱ्हाडी’ मंडळींनी लक्षात ठेवलेलं बरं, असं म्हणत शिवसेनेने भाजपवर टीकेचे बाण सोडले.

मध्य प्रदेशातील ही ‘उलटी वरात’ भाजपला बेटकुळ्या फुगवणारी जरूर “‘वाटत असली तरी काँग्रेसचे विद्यमान मुख्यमंत्री कमलनाथ हेदेखील कसलेले आणि मुरलेले राजकारणी आहेत. हिकमती आणि करामती आहेत, असंही अग्रलेखात म्हटलं आहे.

दरम्यान, मध्य प्रदेशात पुढे आणखी काय घडतं ते लवकरच समजेल. पण तेथील घडामोडींनी महाराष्ट्रातील भाजपवाल्यांनी उड्या मारू नयेत. मध्य प्रदेशचे राजकारण त्याच्या जागी, महाराष्ट्रामधील कमळ पंथीयांनी चालता बोलता स्वप्ने पाहू नयेत, असा टोलाही भाजपला अग्रलेखातून लगावण्यात आाला आहे.

महत्वाच्या बातम्या-

कमलनाथ चमत्कार करु शकतात; शरद पवारांचा विश्वास

-सरकारने मास्क आणि हॅन्ड वॉश रेशन दुकानातून द्यावेत; चंद्रकांत पाटलांची मागणी

-…तर बाबरीनंतर दंगली उसळल्या नसत्या; शरद पवारांचं मोठं वक्तव्य

-महाराष्ट्रात कोरोनाचे 10 रूग्ण; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषदेत माहिती

-ज्योतिरादित्य शिंदेनी भाजपप्रवेश करताच राजेंच खास ट्वीट