उद्धव ठाकरेंकडे आपण उद्याचे पंतप्रधान म्हणून पाहतोय- संजय राऊत

मुंबई |    मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे आपण उद्याचे पंतप्रधान म्हणून पाहतोय. आता राज्याच्या सीमा ओलांडण्याची वेळ आली आहे, असं वक्तव्य शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.

दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेना पक्षाचा आज 54 वा वर्धापनदिन आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकत्र जमत उत्सव साजरा करणं किंवा राजकीय सभा करणं यावर बंधनं आहेत. यामुळे शिवसेना नेत्यांनी डिजीटल पद्धतीने सेनेचा 54 वा वर्धापनदिन साजरा केला.

पक्षाचा विचार आणि सरकार एकत्र चाललं पाहिजे. सत्तेवर असल्याचं भान ठेवून आपल्याला आता काम करावं लागेल, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असल्यामुळेच कोरोनाचं युद्ध आपण यशस्वीपणे लढतोय आणि आपण हे युद्ध जिंकणारच आहोत, असंही ते यावेळी म्हणाले.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची भविष्यातील वाटचाल आणि दिशा यावर आपलं मत फेसबुक लाईव्हद्वारे व्यक्त केलं. यावेळी येणाऱ्या काळामध्ये माझ्या शिवसैनिकाला मी पंतप्रधानपदी नक्की बसवणार, असा निर्धार त्यांनी केला.

महत्वाच्या बातम्या-

-‘भविष्यात शिवसैनिकाला पंतप्रधानही करणार’; सेनेच्या 54 व्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंचा निर्धार

-चार महिन्यांच्या बाळाला चांदणी चौकातील झुडपात सोडणारी आई अटकेत

-‘…तर भाजप ठाकरे सरकारला पाठिंबा देईल’; ‘या’ भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य

-फिल्मी बॅकग्राऊंड असूनही फ्लॉप ठरले ‘हे’ स्टार किड्स; पाचवा कलाकार तर सर्वात अनलकी!

-सुशांतच्या आत्महत्येबाबत गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीचा मोठा खुलासा, म्हणाली…