फूटपाथवर राहून दहावीत उत्तीर्ण झालेल्या अस्माला घर मिळवून देणयासाठी प्रयत्न करणार- आमदार प्रताप सरनाईक

मुंबई | राज्यात काल एसएससी बोर्डाचा निकाल जाहीर झाला. काही विद्यार्थ्यांना सर्वसोईसुविधा उपलब्ध असतानाही ते शिकत नाहीत. मात्र मुंबईच्या फूटपाथवर राहून अस्मा शेखने या विद्यार्थीनीने दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होत 40 टक्के मिळवले आहेत.

जेव्हा अस्माच्या परिस्थितीबद्दल आणि तिच्या जिद्दबद्दल जेव्हा सर्वांना माहिती झाली तेव्हा सर्वांनी तिचं कौतूक करत तिला मदतीचा हात दिला आहे. परीक्षेत 40 टक्के गूण मिळवणाऱ्या अस्मा शेखचे यश अधिक लक्षवेधी कामगिरी केली आहेशिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनीही पुढे येत तिला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. आज तिचे अभिनंदन करण्यासाठी आमदार प्रताप सरनाईक यांनी तिला फोन करुन तिचं कौतूक केलं.

यावेळी अस्माने फोनवर बोलताना प्रताप सरनाईक यांच्याकडे आम्हाला हक्काचं घर दया, अशी मागणी केली. राज्याचे मुख्यमंत्री नगरविकास मंत्री तसेच गृहनिर्माण मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करुन MMRDA किंवा म्हाडाकडून अस्मा शेखला हक्काचे घर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करु, असं आश्वासन नाईकांनी अस्माला दिलं.

दरम्यान, कोकण विभागाचा निकाल सर्वात जास्त म्हणजे 98.77 टक्के, तर औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे 92 टक्के इतका लागला. पुणे विभागाचा निकाल 97.34 टक्के लागला, तर मुंबई विभागातून 96.72 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सालाबादप्रमाणे यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली.

महत्वाच्या बातम्या-

अयोध्येत बुध्दविहार साकारण्यासाठी सर्व आंबेडकरी नेत्यांनी एकत्र येऊन लढा देणं गरजेचं- आनंद शिंदे

तरुणीच्या गुप्तांगातील स्वॅब नमुने प्रकरणावर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा संतापल्या; म्हणाल्या…

पत्नीला रोगानं ग्रासलं, नातेवाईकांनी त्याला नाकारलं; तो मात्र एकटाच जळत राहिला!

आईसोबत खेळत असताना बाल्कनीतून तोल जाऊन 2 वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू

‘होय मी अनेकांचे खून केले, कित्येकांच्या किडण्याही काढल्या’; डॉक्टरचा धक्कादायक जबाब