भारत चीन सीमेवर टोकाचा संघर्ष, राऊतांचे पंतप्रधान मोदींना मुलभूत पण कळीचे प्रश्न

मुंबई |   लडाखच्या गलवान खोऱ्यात चिनी सैन्यासोबत झालेल्या हिंसक झटापटीत भारताचे 20 जवान शहीद झाले आहेत. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी याविषयीच काही मुलभूत पण कळीचे प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारले आहेत.

चीनच्या कारवाईला आपण चोख प्रत्युत्तर कधी देणार आहात? एकही एकही गोळी न चालवता चीनने आपले 20 जवान मारले आहेत. आपण नेमके काय केले? चीनचे किती जवान मारले गेले? असे प्रश्न राऊत यांनी मोदींना विचारले आहेत.

चीनने आपल्या भूमीत घुसखोरी केलीये का? पंतप्रधान मोदीजी, या संघर्षाच्या काळात देश तुमच्या पाठीशी आहे, मात्र खरं नेमकं आहे तरी काय?? देशाला सत्य जाणून घ्यायचंय तुम्ही काहीतरी बोला , अशी विनंती राऊत यांनी मोदींनी केली आहे,

तसंच पंतप्रधान मोदीजी आपण शूरवीर आणि योद्धे आहात. आपल्या नेतृत्वात भारत चीनचा बदला घेईन असा विश्वास व्यक्त करत तोपर्यंत काल आणि परवा भारत-चीन सीमेवर काय झाले ते सांगा, असं राऊत म्हणाले आहेत.

 

 

महत्वाच्या बातम्या-

-कोरोनाविरुद्धच्या लढाईतील ‘पोलीस योद्धे’ या पदकाने गौरविले जाणार, गृहमंत्र्यांची मोठी घोषणा

-‘पुण्याचे कारभारी पालिकेतील सत्ताधाऱ्यांना भारी’… या महत्त्वाच्या निर्णयाला दिली स्थगिती!

-राजेश टोपेंची महाराष्ट्राला पुन्हा एकदा गुडन्यूज…

-देशात कोरोनाचा धुमाकूळ… मागच्या 24 तासांत तब्बल 2 हजार लोकांचा मृत्यू!

-ज्या घरासमोर आंदोलन त्याच घरातून आमदारकी, राजू शेट्टी म्हणतात…