आमदारांनंतर खासदारांनीही उद्धव ठाकरेंचं टेंशन वाढवलं, शिवसेनेला आणखी एक धक्का बसणार?

मुंबई | एकनाथ शिंदेच्या बंडळीनंतर शिवसेनेच्या गोटात चांगलीच खळबळ उडालेली पाहायला मिळाली. शिवसेना आमदारांचा मोठा गट एकनाथ शिंदेंसोबत फुटल्याने शिवसेनेला मोठं भगदाड पडलं.

शिंदे गटाच्या बंडखोरीमुळे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावं लागलं होतं. आमदारांच्या बंडाळीमुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला असताना आता खासदारांमध्ये देखील नाराजीचा सूर असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे.

बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेचे 12 खासदार शिंदे गटात येणार असल्याचा गौप्यस्फोट केला. शिवसेना खासदारांच्या नाराजीच्या चर्चांना उधाण आलं असल्याने शिवसेनेला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे.

शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा, अशी मागणी शेवाळे यांनी केली आहे.

शिवसेनेच्या आमदारांपाठोपाठ आता खासदारही भाजपला सहकार्य करण्याची भूमिका मांडत आहेत. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीपाठोपाठ राष्ट्रपती निवडणुकीतही शिवसेना खासदारांची मतं भाजपच्या पारड्यात जाण्याची शक्यता आहे.

द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचे आदेश शिवसेनेने खासदारांना द्यावे, अशी मागणी राहुल शेवाळे यांनी केली आहे.

दरम्यान, आमदारांच्या बंडाळीनंतर आता खासदारही भाजपला पाठिंबा देण्याची मागणी करत आहेत. त्यामुळे  शिवसेनेला आणखी एक धक्का बसणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

शिंदे सरकारचा रिमोट कोणाच्या हातात?, एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

‘…आणि योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम केला’, देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य

मोठी बातमी! भाजप प्रदेशाध्यक्ष पदासाठी ‘ही’ नावे सर्वाधिक चर्चेत

लालू प्रसाद यादव यांच्या प्रकृतीसंदर्भात महत्त्वाची माहिती समोर!

‘देवेंद्र मध्यरात्री वेश बदलून…’; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट