एक केजरीवाल सगळ्यांना भारी पडतायेत; सामनातून शब्दफुलांचा वर्षाव

मुंबई | दिल्लीत काँग्रेसचं अस्तित्व फारसं उरलेलं नाही. भाजप सुकलेल्या तलावात कमळ फुलवीत आहे. एक केजरीवाल सगळ्यांना लय भारी पडताना दिसत आहेत, असं म्हणत शिवसेनेनं सामना अग्रलेखातून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची स्तुती केली आहे. तसेच भाजपला चिमटे काढले आहेत.

केजरीवाल यांनी मागच्या पाच वर्षात केलेल्या कामांवर मतं मागितली आहेत. देशाच्या राजकारणात हा वेगळा प्रयोग आहे. राजकीय मतभेदांच्या पलिकडे जाऊन या प्रयोगाचे स्वागत केले पाहिजे. दिल्लीचे मतदार सूज्ञ झाले आहेत. त्यांना शहाणपणाचे डोस पाजण्याची गरज नाही, असंही सामनातून म्हणण्यात आलं आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी 200 खासदार, भाजपचे सर्व मुख्यमंत्री, संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ कामाला लागले आहे, पण इतकं करुनही एक केजरीवाल सगळ्यांना भारी पडत आहे, असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

महाराष्ट्र हातचे गेले, झारखंडमध्ये दारुण पराभव झाला, त्यामुळे दिल्लीत तरी झेंडा फडकवावा, असं भाजपला वाटल्यास चुकीचं काय?, असा टोलाही शिवसेनेनं लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-पंतप्रधान मोदींकडून राहुल गांधींना ‘ट्युबलाईट’ची उपमा!

-आपल्यातील भांडणं विसरुन कठोर निर्णय घ्या; अमृता फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना आवाहन

-पीडितेला भेटायला जाताना यशोमती ठाकूरांसोबत कार्यकर्त्यांची गर्दी

-महराष्ट्रात पवारांचे राज्य पुन्हा सुरु झाले- माधव भंडारी

-प्रदूषणासाठी मुख्यमंत्री डोंबिवलीत येताहेत हे दुर्दैव- राजू पाटील