गृहखाते अनिल देशमुखांच्या मानगुटीवर बसले काय?; शिवसेनेचा ‘सामना’तून सवाल

मुंबई | महाराष्ट्राचे नवे गृहमंत्री म्हणून अनिल देशमुख यांच्या नावाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संमती दिली आहे. गृहखातं अनिल देशमुखांच्या मानगुटीवर बसले काय? गृहखातं जोखमीचं असतं, असं म्हणत सामना अग्रलेखातून राष्ट्रवादीचे कान टोचण्यात आले आहेत.

आमच्याकडे गृहखातं घ्यायला कोणी तयारच नाही, आमच्यात गृहखातं नको म्हणणारेच जास्त आहेत, असं खुद्द शरद पवार यांनी दोन-तीन दिवसांपूर्वी सांगितलं होतं. त्यामुळे हे खातं देशमुखांच्या मानगुटीवर बसले काय?, असा सवाल शिवसेनेनं केला आहे.

अजित पवार आणि दिलीप वळसे पाटलांसारखा नेता गृहखातं सांभाळण्यास सक्षम होता. मात्र पवारांनी भाकरी फिरवली आणि गृहखातं विदर्भाकडे वळवलं. शरद पवारांचा हा नवा प्रयोग किती यशस्वी ठरला हे कळलेच, असंही अग्रलेखात म्हणण्यात आलं आहे.

भाजपच्या काळात गृहखात्याची नंगी तलवार घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फिरत होते, पण शेवटी या तलवारीनेच त्यांचा घात केला, असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-