“देवेंद्र फडणवीस मिस्टर इंडिया बनून बाबरीच्या ढांच्यावर हातोडा मारत होते का?”

मुंबई | मुंबईतील ‘बूस्टर’ सभेत बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडलं होतं. बाबरी पाडली तेव्हा मी तिथे होतो शिवसेनेचा एकही नेता तिथे नव्हता, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याचा शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून जोरदार समाचार घेतला आहे.

ला आहे. बाबरी ढांचा पाडताना एकही शिवसैनिक अयोध्येत नव्हता, असे फडणवीस म्हणतात. फडणवीस म्हणतात, म्हणजे तेथे ते असणारच, पण सीबीआयच्या विशेष न्यायालयातील आरोपपत्रात त्यांचे नाव कोठेच दिसत नाही. शिवसेनेचे अनेक नेते आणि शिवसैनिकांची नावे बाबरी प्रकरणाच्या आरोपपत्रात आहेत. मग देवेंद्र फडणवीस मिस्टर इंडिया बनून बाबरीच्या ढांच्यावर हातोडा मारत होते का, याचा गुप्त तपास नव्याने करावा लागेल, अशी खोचक टीका शिवसेनेने केली आहे.

भाजपच्या बुस्टर सभेत देवेंद्र फडणवीस हे शिवसेनेवर तुटून पडले. तर औरंगाबाद येथील सभेत त्यांचे उपवस्त्र श्री. शरद पवार यांच्यावर तुटून पडले. ते ठरवून झालं. त्यामधून महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या जनतेला काय मिळालं? उपवस्त्राला बुस्टर देण्याचं काम मुंबईतूनच सुरु होतं. पण भाजपलाही बुस्टर डोसची गरज आहे, असं शिवसेनेनं म्हटलंय.

भाजप त्यांच्या उपवस्त्राला अयोध्येला का पाठवत आहे? भाजपचे काही सांगता येत नाही. औरंगाबादमध्ये भाजपच्या उपवस्त्राने सांगितले, मशिदींवरील अनधिकृत भोंगे काढा, नाही तर आम्ही थांबणार नाही, असं म्हणत शिवसेनेनं अग्रलेखातून राज ठाकरेंवर देखील टीका केलीये.

डोक्याचा तुळतुळीत गोटा केलेला माणूस भगवे कपडे घालून फिरतोय. हे किळसवाणं असल्याचं त्यांचं मत होतं. पण आता अचानक हा ‘गोटा’ त्यांना प्रिय झाला, असं म्हणत शिवसेनेनं राज ठाकरेंवर टीका केलीये.

महत्त्वाच्या बातम्या- 

“संसार उभारण्यासाठी अक्कल लागते, धुडगूस घालण्यासाठी अक्कल लागत नाही” 

 राज ठाकरेंचा मनसेसैनिकांना नवा आदेश, म्हणाले…

 “इथं कोणाची हुकुमशाही चालणार नाही, मग तो कोणीही असो”

राज ठाकरेंवर कारवाई होणार?, गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांचं मोठं वक्तव्य 

“उद्धव ठाकरे होते म्हणून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले होते”