श्रद्धा अन् टायगर हटके अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला ; पाहा व्हिडीओ

मुंबई | बाघी आणि बाघी 2 या चित्रपटांना उत्तूंग असा प्रतिसाद भेटल्यानंतर आता बाघी 3 प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटातील ‘दस बहाने 2.0 हे नवीन गाणं प्रदर्शित झालं आहे. विशेष म्हणजे या गाण्यामध्ये श्रद्धा आणि टायगर यांचा नवीन बोल्ड अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

2005 मध्ये आलेल्या ‘दस’ या चित्रपटातील गाणं ‘दस बहाने’ आता पून्हा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. बाघी 3 या चित्रपटातील निर्मात्यांनी हे गाणं पून्हा एकदा बनवलं आहे. ‘दस बहाने 2.0’ हे गाणं नवीन अंदाजात शूट करण्यात आलं असून त्यामध्ये आपल्याला श्रद्धा आणि टायगर हटके अंदाजात दिसत आहे.

‘दस बहाने 2.0’ या गाण्यामध्ये श्रद्धा आणि टायगर यांची केमेस्टी प्रेक्षकांना पाहायला मिळाली असून प्रेक्षकांना ती खिळवून ठेवणारी आहे, टायगर श्रॉफ कधी हेलिकॉप्टरवर डान्स करताना दिसत आहे. तर कधी बर्फामध्ये नाचताना दिसत आहे आणि  त्यासोबत श्रद्धाची साथ. त्यामुळे या गाण्याला जास्तीत जास्त पसंती मिळत आहे.

बाघी 3 हा चित्रपट येत्या 6 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आता चित्रपटाला किती पसंती मिळेल हे पाहणं महत्वाचं ठरेल.

महत्वाच्या बातम्या –

-कमलनाथ, तमाम शिवभक्तांची माफी मागा- उदयनराजे भोसले

-उद्धवजी, हिंमत असेल तर एकट्याने विधानसभा निवडणूक लढवून दाखवा- चंद्रकांत पाटील

-छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बुलडोझरने हटवण्याचा प्रयत्न; संभाजीराजे भडकले

-“चंद्रकांत पाटलांना मुख्यमंत्री व्हायचंय पण…”

-दादा खेळत रहा, वेळ चांगला जाईल; शिवसेनेचा चंद्रकांत पाटलांना सल्ला