“राजकारणी आहात तर राजकारण करा, उगाच…”

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्यातील एसटी कर्मचारी संपावर आहेत. एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारकडे एसटी महामंडळाचे विलिनीकरण करण्याची मागणी केली आहे. तसेच जोपर्यंत एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यात येणार नाही, तोवर संप मागे घेतला जाणार नाही, अशी भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवरून राज्यात राजकीय नेत्यांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यातच आता राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना जोरदार टोला लगावला आहे.

सुधीर मुनगंटीवार सोनार कधीपासून झाले. राजकारणी आहात, राजकारणी रहा. कॅरेट बिरेट मोजत बसू नका, असा टोला अनिल परब यांनी सुधीर मुनगंटीवारांना लगावला आहे.

सुधीर मुनगंटीवारांनी सोनाराचा धंदा कधीपासून सुरू केला. त्यांना म्हणावं आपण राजकारणी आहात, राजकारण करावं. कॅरेटबिरेट तपासण्याचं काम सुधीर मुनगंटीवारांचं नाही, अशी बोचरी टीका अनिल परब यांनी केली आहे.

दरम्यान, 24 कॅरेटची शिवसेना पुर्णपणे बदलली आहे, अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेवर केली होती. त्यावरूनच अनिल परब यांनी सुधीर मुनगंटीवारांना चिमटे काढले आहेत.

उच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीसमोर कर्मचाऱ्यांनी आपले म्हणणे मांडावे, असं मी नेहमी सांगत होतो. आज या समितीची पाच वाजता बैठक होत आहे, मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. तसेच या बैठकीला एसटी कामगार संघटनेच्या प्रतिनिधींनाही बोलावलं आहे, अशी माहिती अनिल परब यांनी दिली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या काय समस्या आहेत. त्यांना काय देता येऊ शकतं याबाबत संबंधित मंत्र्यांशी चर्चा करत आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत पुन्हा एकदा बोलणार आहे. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार आहे, असंही अनिल परब म्हणाले आहेत.

हा प्रश्न चर्चेतुन सुटू शकतो एसटी कामगारांनी संप मागे घ्यावा, असं आवाहन अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना केलं आहे.

यावेळी अनिल परब यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनाही टोला लगावला आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्याशी दोनवेळा बोललो, असं परब म्हणाले

त्यांच्यासमोर दोन प्रस्ताव ठेवले आहेत. ते कामगारांशी परत येतो म्हणून गेले आहेत. कदाचित कामगारांना समजवण्यात ते कमी पडले असतील किंवा कामगार त्यांचं ऐकण्याच्या मनस्थितीत नसतील, असा खोचक टोला अनिल परब यांनी लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-  

काॅंग्रेसची डोकेदुखी वाढली! राज्यातील ‘या’ दोन दिग्गज नेत्यांचा वाद चव्हाट्यावर

 “उद्धव ठाकरे पार्टटाईम मुख्यमंत्री, राज्याला फडणवीसांसारखा फुलटाईम मुख्यमंत्री हवा”

  ‘…तर होय, एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात भाजपचा हात’; राऊतांच्या आरोपावर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

  मुंबईकरांनो सावधान! आता ‘या’ गोष्टीने वाढवले टेंशन 

  नवाब मलिकांचा गौप्यस्फोट; ‘त्या’ दोघांचे व्हाॅट्सअॅप चॅट शेअर करत म्हणाले…