गायिका कनिका कपूरची सहावी टेस्ट निगेटीव्ह; डिस्चार्जनंतर होम क्वारंटाईन

नवी दिल्ली |  गायिका कनिका कपूरने अखेर कोरोनावर मात केली आहे. तिची सहावी टेस्ट निगेटीव्ह आली आहे. त्यामुळे तिला रूग्णालयातून डिस्चार्ज देऊन होम क्वारंटाईन केलं गेलं आहे.

कनिकाच्या पहिल्या पाच चाचण्या या पॉझिटिव्ह आल्या होत्या. मात्र, त्यानंतरची चाचण्या निगेटिव्ह आल्याने कनिका कपूरच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसंच तिनेही टेस्ट निगेटीव्ह आल्यानंतर सुटकेचा निश्वास सोडला आहे.

कनिकाच्या डिस्चार्जची बातमीवर तिचा भाऊ अनुरागने शिक्कामोर्तब केलं आहे. लखनऊच्या रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. ती आता घरी आहे आणि ठीक आहे, असं त्याने सांगितलं आहे.

तिच्यात चांगली सुधारणा झाली आहे. कानिकाला कोणत्याही प्रकारची खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आलेला नाही आणि तिच्यामुळे कोणालाही संसर्ग झाला नाही याचा त्यांना आनंद झाला आहे.

महत्वाच्या बातम्या 

-चौकशी म्हणजे निव्वळ डोळ्यात धुळफेक; अधिकाऱ्याला निलंबित करा- प्रसिद्ध IAS खेमका

-डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे कोरोनाग्रस्तचा मृत्यू; जिल्हाधिकाऱ्यांनी उचललं कडक पाऊल

-‘रक्षक क्लिनिक’ पॅटर्न राज्यभर राबवण्याचा विचार केला जाईल- आरोग्यमंत्री

-वाधवान कुटुंबाला फिरण्यासाठी विशेष पत्र देणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्यावर गृहमंत्र्यांनी केली कारवाई!

-“गृहमंत्र्यांची सखोल चौकशी करून त्यांचा त्वरित राजीनामा घ्यावा”