“फक्त आवाज द्या, ‘खाकी’ घालून तुमच्या खांद्याला खांदा लावून उभा राहतो”

मुंबई | ‘कोरोना’शी दोन हात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक योगदान देण्याचं आवाहन केलं आहे. बॉलिवूड कलाकारांपासून सर्वसामान्य नागरिकांनी आपापल्या परीने मदतीचा हात दिला आहे. अभिनेता अजय देवगन याने ट्वीट करत मुंबई पोलिसांच्या जोडीने मैदानात उतरण्याची तयारी दर्शवली आहे.

प्रिय मुंबई पोलिस, तुम्ही जगातील सर्वोत्कृष्ट म्हणून ओळखले जाता. कोविड 19 साथीच्या काळात तुमचे योगदान अतुलनीय आहे. आपण हाक द्या, हा ‘सिंघम’ आपली ‘खाकी’ घालून आपल्या बाजूला उभा राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र’, असं जय देवगणनं केलं आहे.

कोरोनाविरोधात लढण्यासाठी अजय देवगणनेची 25 कोटी 51 लाखांची मदत केली आहे. पीएम केअर फंडसाठी 15 कोटी, महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 5 कोटी, तर उत्तर प्रदेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 5 कोटी रुपयांचे योगदान त्याने दिलं आहे.

दरम्यान, गेल्या आठवड्यात अजयने ‘FWICE’ अर्थात फेडरेशन ऑफ वेस्टर्न सिने एम्प्लॉइज’ला 51 लाखांची मदत केली होती.

 

महत्वाच्या बातम्या-

-अनंत करमुसे मारहाण प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाच जणांना अटक

-महाराष्ट्रासाठी पनवती असले तरी स्वतःसाठी नशीबवान आहेत उद्धव ठाकरे – निलेश राणे

-आमच्यासाठी 10,000 व्हेंटिलेटर बनवा, तुमचे उपकार कधीच विसरणार नाही- शोएब अख्तर

-‘रामायण’ मालिकेत सुग्रीवची भूमिका साकारणारे श्याम सुंदर काळाच्या पडद्याआड

-शिवभोजन एकदाच मिळतं, दुसऱ्यांदा काय लोकांनी उपाशी राहावं का?- देवेंद्र फडणवीस