“…म्हणून पंजाबमध्ये आपचा विजय झाला”, शरद पवारांनी सांगितलं कारण

मुंबई | पंजाब विधानसभा निवडणुकीचा निकाल आता स्पष्ट होताना दिसत आहे. पंजाबमध्ये आपचा झाडू चालल्याचं पहायला मिळतंय. तर उत्तर प्रदेशात भाजपचा बुलडोझर चालला आहे.

पंजाबमध्ये काँग्रेस आणि भाजपचा दारूण पराभव झाल्याने आता पंजाबात आनंदाचं वातावरण आहे. अशातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपच्या विजयाचं कारण सांगितलं आहे.

पाच राज्यांची निवडणूक झाली त्यातील चार राज्यात भाजपची सत्ता होती. तर एका राज्यात काँग्रेसचं सरकार आहे. पंजाबमध्ये एक वेगळं चित्र पहायला मिळतंय, असं शरद पवार म्हणाले आहेत.

पंजाबमधला बदल भाजपला अनुसरूण नाही तर हा बादल काँग्रेस पक्षाला एक प्रकारे धक्का देणारा असल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे. अलिकडे तयार झालेला पक्षाने ही कमाल केल्याचं देखील त्यांनी यावेळी बोलून दाखवलं.

दोन वेळा आपने ज्याप्रकारे विजय मिळवला आणि ज्याप्रकारे सरकार चालवलं त्याबद्दलची मान्यता दिल्लीच्या सर्वसामान्य लोकांमध्ये आहे, असंही शरद पवार म्हणाले आहेत.

दिल्लीतील कामाचा परिणाम आणि चांगला लाभ आपला पंजाबमध्ये झाल्याने आपला या ठिकाणी विजय मिळता आल्याचं देखील त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

दरम्यान, काही वेळापूर्वी आलेल्या माहितीनुसार आप ला 90 जागा मिळत असल्याचं चित्र आहे तर काँग्रेस वगळता इतर पक्षांना दुहेरी आकडा देखील गाठता आला नाही.

महत्त्वाच्या बातम्या – 

काँग्रेसला जमलं नाही ते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी करुन दाखवलं!

भाजपचा राऊतांना चिमटा, म्हणाले “संजय राऊत हाउज द जोश!” 

‘म्याऊ म्याऊ’ म्हणत नितेश राणेंनी शिवसेनेला पुन्हा डिवचलं; ट्विट करत म्हणाले…

Goa Election Result 2022 | मुख्यमंत्री प्रमोद सावंत हरता-हरता जिंकले

नोटापेक्षाही कमी मतं मिळालेल्या शिवसेना अन् राष्ट्रवादीला भाजपने डिवचलं!