भाजपला मोठा धक्का बसणार? सोलापूरच्या खासदाराची खासदारकी जाण्याची शक्यता

सोलापूर | सोलापूरचे खासदार जयसिध्देश्‍वर महाराज यांच्या जात प्रमाणपत्रावरील सुनावणी आज पूर्ण झाली. यावेळी खासदारांच्या वकिलांनी दिलेले 12 अर्ज जातपडताळणी समितीने फेटाळून लावले आहेत. जात पडताळणी समितीने सांगूनही जयसिद्धेश्वर महाराजांनी तक्रारदारांनी आक्षेप घेतलेली मूळ कागदपत्रे न दिल्याने भाजपला धक्‍का बसण्याची दाट शक्‍यता निर्माण झाली आहे. त्यांच्या खासदारकीवरच टांगती तलवार असल्याची चर्चा आहे.

त्यांच्या बोगस जात पडताळणी सर्टिफिकेटवरील सुनावणी पूर्ण झाली आहे. आता टपालाद्वारे पडताळणी समिती निकाल पोहोच करणार आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या जयसिद्धेश्वर स्वामींनी काँग्रेसचे दिग्गज नेते सुशीलकुमार शिंदे आणि वंचितचे प्रकाश आंबेडकर यांना पराभवाची धूळ चारली होती.

जयसिध्देश्‍वर यांनी लिंगायत समाजातील बेडा जंगम असल्याचं जात प्रमाणपत्र निवडणुकीवेळी दिले होते. यावर आक्षेप घेत प्रमोद गायकवाड, मिलिंद मुळे, विनायक कंदकुरे यांनी जात पडताळणी समितीने दाखला तपासावा आणि खासदारांचे प्रमाणपत्र रद्द करावे, अशी मागणी केली होती. आता निकालावर हा खटला बंद झाला असून आगामी आठ दिवसात पडताळणी समिती निकाल जाहीर करणार आहे.

दुसरीकडे पडताळणी समितीने तक्रारदारांनी आक्षेप घेतलेली मूळ कागदपत्रे द्यावीत, अशा प्रकारची कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मात्र, अद्यापपर्यंत जयसिद्धेश्वर महाराजांनी मूळ कागदपत्रे सादर केली नाहीत. त्यामुळे भाजपला निश्‍चितपणे धक्‍का बसेल, असं तक्रारदारांचं म्हणणं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-महाराज तुम्ही खचू नका, संपूर्ण महाराष्ट्र तुमच्यासोबत- राष्ट्रवादी आमदार किरण लहामटे

-इंदुरीकर महाराज आपण कीर्तन सोडू नका, लोकांना स्त्रियांचा आदर करायला शिकवा- चाकणकर

-पुण्यात नवी पोस्टरबाजी… ‘हॅपी अ‌ॅनिव्हर्सरी, सॉरी आप्पू’

-ज्यांच्या विरोधात 35 वर्ष संघर्ष केला त्यांनीच माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवला- उद्धव ठाकरे

-“महापरिक्षा पोर्टल बंद करण्याविषयी सरकारने तातडीने घोषणा करावी”