क्रिकेट असो की राजकारण ‘पवार’ play शिवाय जिंकता येत नाही- सोनाली कुलकर्णी

मुंबई | अजित पवारांनी भाजपला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीतला एक मोठा गट अजित पवारांसोबत असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा शपथविधी सोहळ्यानंतर सोशल मीडियावर चर्चा रंगल्याचं पहायला मिळत आहे. अशातच अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं ट्विट करत आपलं मत मांडलं आहे.

पवार’ play शिवाय जिंकता येत नाही…. असं दिसतंय… क्रिकेट वर्ल्डकप फायनल काय नाही तर #महाराष्ट्रविधानसभानिवडणूक काय पण या राजकीय ड्रामा चा ‘पवार’full end झाला आहे का नाही अजून, काय वाटतंय?, असं सूचक ट्विट अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं केलं आहे.

महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडीवर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनेदेखील ट्विट करत तिचं मत मांडलं आहे. सोनाली कुलकर्णीप्रमाणे दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी सकाळी फेसबुकच्या माध्यमातून त्यांचं मत व्यक्त केलं होत.

23 नोव्हेंबर 2018 एक वर्षांपूर्वी” मुळशी पॅटर्न ” रिलिज झाला होता .. आज 23 नोव्हेंबर 2019 महाराष्ट्र पॅटर्न रिलिज झाला …, अशी पोस्ट प्रविण तरडे यांनी केली होती.

 

सोनाली कुलकर्णीच ट्विट-

 

 

 

महत्त्वाच्या बातम्या-