महाराष्ट्रातील सत्ता नाट्यावरून सोनिया गांधी आक्रमक; संसदेच्या आवारात घोषणाबाजी

नवी दिल्ली | महाराष्ट्रातल्या सत्तानाट्याचे पडसाद आज संसदेत देखील उमटलेले पाहायला मिळाले. राज्यातील सर्व घडोमोडींच्या पार्श्वभूमिवर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात संसदेच्या आवारात सरकारविरोधी निषेध मोर्चा काढण्यात आला.

सोनिया गांधी यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी हातात फलक घेऊन मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सरकारविरोधात निषेध व्यक्त केला आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील भाजपवर आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. महाराष्ट्रात भाजप जे काही करतंय ते लोकशाहीची हत्या आहे, असं राहुल यांनी म्हटलंय.

दरम्यान, मला संसदेत काही प्रश्न विचारायचे आहेत. मात्र त्याला काही अर्थ नाहीेये. कारण महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या झालीये, असं राहुल गांधींनी म्हटलं. लोकसभेचं कामकाज सुरू होताच, बंद करा… बंद करा…. संविधानाची हत्या बंद करा, अशा घोषणा विरोधी पक्षाने दिल्या.

 

महत्वाच्या बातम्या-