सोनिया गांधी कॉंग्रेस पक्षाचं अध्यक्षपद सोडणार; पक्षाचा नवीन अध्यक्ष कोण?

नवी दिल्ली | गेल्या काही दिवसांपासून देशात चांगलंच राजकीय नाट्य रंगलं आहे. विरोधी पक्ष आणि सरकार यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या खेळी चालुच आहेत. कॉंग्रेस पक्षांतर्गत सुद्धा गेल्या काही दिवसांपासून अनेक घडामोडी चालू आहेत. कॉंग्रेस पक्षातील काही नेतेच एकमेकांवर नाराज असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून चालू आहेत. अशातच कॉंग्रेस पक्षाविषयी अत्यंत महत्वाची माहिती समोर येत आहे.

सोनिया गांधी गेल्या वर्षभरापासून कॉंग्रेस पक्षाचं हंगामी अध्यक्षपद सांभाळत होत्या. मात्र, सोनिया गांधी यांनी अध्यक्षपद सोडण्याची घोषणा केली आहे. कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरील आपला कार्यकाळ पूर्ण झालेला आहे. त्यामुळे आपण आता कॉंग्रेस पक्षाचं अध्यक्षपद सोडणार असल्याचं सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे.

कॉंग्रेस पक्षाचा नवा अध्यक्ष कोण असेल? या प्रश्नाकडे सर्वांच लक्ष लागून आहे. मात्र, पक्षाचा नवीन अध्यक्ष कोण असावा या मुद्द्यावरून पक्षांतर्गत वाद चालू आहेत. या मुद्द्यावरून कॉंग्रेस पक्ष दोन गटांमध्ये विभागला गेला आहे.

कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी गांधी कुटुंबातील व्यक्ती सोडून दुसऱ्या कोणत्या तरी नेत्याची नियुक्ती करावी अशी मागणी कॉंग्रेस मधील काही नेते करत आहेत. तर, गांधी कुटुंबातीलच कोणाची तरी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करावी, अशी मागणी काही नेते करत आहेत. त्यामुळे या मुद्द्यावरून पक्षात दोन गट पडले आहेत.

गेल्या काही वर्षांपासून देशातील राजकारणात कॉंग्रेसला उतरती कळा लागली आहे. सलग दोन लोकसभा निवडणुकीमध्ये कॉंग्रेस पक्षाला हार पत्करावी लागली आहे. तसेच सध्या देशातील काही मोजक्याच राज्यांमध्ये कॉंग्रेस पक्ष सत्तेत आहे. एकूणच मागच्या काही निवडणुकांमध्ये पक्षाची कामगिरी अतिशय वाईट आहे.

याच पार्श्वभूमीवर कॉंग्रेस पक्षातील 23 वरिष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं आहे. पक्षाला मोठ्या बदलाची गरज असल्याचं त्यांनी या पत्रातून म्हटलं आहे. तसेच पक्षाला पूर्ण वेळ आणि प्रभावी अध्यक्षाची सध्या गरज आहे, असंही या 23 नेत्यांनी पत्राद्वारे म्हटलं आहे. दरम्यान, येत्या काळात कॉंग्रेस पक्षाचा नवीन अध्यक्ष कोण असेल? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

राज्यातील तीनचाकी सरकारमध्ये फूट? ‘या’ कारणामुळे कॉंग्रेसचे 11 आमदार बसणार उपोषणाला

सुशांतचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट येण्यापूर्वीच विनापरवाना रिया शवगृहात काय करत होती?

सुशांतच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये घोळ?; पाच डॉक्टर्स सीबीआय टीमच्या चौकशीच्या घेऱ्यात

“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रामाणिक व्हावं, ते खोटं बोलत नाही असा एकही दिवस नाही”

गणपतीच्या पाटाखाली भारताचे संविधान ठेवल्यामुळे ट्रोल झालेल्या तरडेंनी मागितली जाहीर माफी; म्हणाले…