सोनिया गांधी यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप; म्हणतात…

नवी दिल्ली : देशाच्या आर्थिक स्थितीवर चिंता व्यक्त करतानाच या मुद्द्यावर केंद्रातील मोदी सरकारविरोधात 15 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर दरम्यान देशभरात आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज केली.

मोदी सरकार जनादेशाचा ‘अत्यंत धोकादायक’ पद्धतीने गैरफायदा घेत आहे. डबघाईला आलेल्या अर्थव्यवस्थेवरून लक्ष अन्यत्र वळवण्यासाठी सूडाचं राजकारण खेळलं जात आहे, असा आरोपही सोनिया गांधींनी केला आहे.

काँग्रेस सरचिटणीस, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेसशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक आज काँग्रेस मुख्यालयात पार पडली. या बैठकीत मार्गदर्शन करताना सोनिया गांधी यांनी आंदोलनाच्या माध्यमातून मोदी सरकारला जनतेपुढे उघडं पाडण्याची गरज असल्याचे सांगितलं.

आपला संकल्प आणि संयमाचीच ही परीक्षा असून आता आंदोलनाच्या मार्गाने आपल्याला पुढे जावं लागणार आहे, असं आवाहनही सोनियांनी यावेळी केल्याचं समजतय.

मोदी सरकारमुळे लोकशाही धोक्यात आहे. हे सरकार जनतेकडून जो कौल मिळाला आहे त्याचा पूर्णपणे गैरफायदा घेत आहे. सूडाचं राजकारण खेळून विरोधी पक्षाच्या नेत्यांना त्रास दिला जात आहे, असा आरोप सोनिया गांधींनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या-