“धोनीपेक्षा भारी कुणीच नाही, या बाबतीत सचिनही धोनीसमोर फिका”

नवी दिल्ली | भारताला क्रिकेटची महासत्ता बनवण्यात महत्त्वाचं योगदान देणाऱ्या खेळाडूंमध्ये भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचं नाव देखील घेतलं जातं

महेंद्रसिंग धोनीनं आपल्या काराकिर्दीत भारताला आयसीसीच्या स्पर्धांमध्ये तीनवेळा विजेता बनवलं आहे. भारताला 2007 च्या पहिल्या टी ट्वेंटी विश्वचषकात विजेतेपद मिळवून देण्यात धोनीचा वाट मोलाचा आहे.

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वातच भारतानं तब्बल 28 वर्षानंतर वनडे विश्वचषक जिंकला. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात भारतानं आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफी देखील जिंकली आहे.

धोनीला क्रिकेट जगतात कॅप्टन कुल म्हणून ओळखलं जातं. धोनीनं आपल्या संयमी नेतृत्वाची छाप आयपीएलमध्येही पाडली आहे. परिणामी जगातील अनेक दिग्गज धोनीची स्तूती करतात.

धोनीच्या प्रशंसा करणाऱ्यांमध्ये आता भारताचे माजी प्रशिक्षक रवि शास्त्री यांचा देखील समावेश झाला आहे. धोनीच्या शांत स्वभावाची शास्त्रींनी प्रशंसा केली आहे.

महेंद्र सिंग धोनीला मी कधीच रागात पाहीलेलं नाही. धोनीच्या पुढं तर सचिन देेखील याबाबतीत फिका आहे. कारण मी सचिनला कित्येकदा रागावताना पाहिलं आहे, असं शास्त्री म्हणाले आहेत.

महेंद्र सिंग धोनीला क्रिकेट खेळताना आणि मैदानाच्या बाहेरही खूप क्वचित वेळी रागात पाहिलं आहे. परिणामी अनेक दिग्गज देखील धोनीची प्रशंसा करत असतात.

दरम्यान, महेंद्रसिंग धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो सध्या आयपीएलमध्ये खेळताना दिसत आहे. सध्या धोनी चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 Bigg Boss 15 Grand Finale: दीपिका आणि सलमानचा अनोखा अंदाज, पाहा व्हिडीओ

मोठी बातमी! मुंबईत पाच मजली इमारत कोसळली, अनेकजण अडकल्याची भीती

“मुख्यमंत्र्यांनी त्वरित निर्णय घ्यावा नाहीतर…”; गोपीचंद पडळकरांचा सरकारला थेट इशारा

“मुख्यमंत्र्यांवर टीका करणारा विरोधी पक्ष नामर्द”, संजय राऊतांचा हल्लाबोल

भारतात फिरू नका, बलात्कार, दहशतवादाच्या घटना वाढत आहेत- जो बायडन