नववी, अकरावीच्या परीक्षा आणि दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द

मुंबई | एसएससीचा इयत्ता दहावीचा भूगोल विषयाचा पेपर रद्द करण्यात आला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि  लॉकडाऊन वाढवल्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे.

कोरोनामुळे अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आलेला दहावीचा भूगोलचा पेपर अखेर रद्द करण्यात आला आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात घोषणा केली. 21 मार्चला इतिहास आणि नागरिकशास्त्र विषयाचा पेपर झाला होता, मात्र 23 मार्चला नियोजित भूगोलाचा पेपर रद्द झाला होता.

नववी आणि अकरावीच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. आधीचे सरासरी मार्क लक्षात घेत संबंधित विद्यार्थ्यांना गुण दिले जाणार आहेत. त्यानुसार नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे दहावी आणि बारावीला प्रवेश मिळेल.

शिक्षण विभागाने पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांची पुढील इयत्तेत वर्णी लागली होती. परंतु कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्या पार्श्वभूमीवर 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

 

महत्वाच्या बातम्या –

-‘…तर तुमचा कणखरपणा दिसला असता’; राजू शेट्टींची उद्धव ठाकरेंवर टीका

-“मात्र जनता चंद्रकांतदादा पाटलांच्या क्वारंटाईन कालखंडात निश्चित वाढ करेल”

-“CSR कायदा काँग्रेस सरकारच्या काळातला, तरीही लोक राजकारण करतायेत”

-…अन् अजित पवारांनी घडवून आणली माय-लेकाची भेट!

-कपीलभाई तुम्हाला पैशाची गरज नसेल पण इतरांना आहे; भारत पाक मालिका खेळण्यावरून शोएबचा टोला