मुंबई | सुशांतसिंह राजपूतच्या मृत्युप्रकरणी अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. मुंबई आणि बिहार पोलिसांनंतर आता याप्रकरणी सीबीआयने तपास सुरू केला आहे. सुशांतची हत्या की आत्महत्या हा गुंता दिवसागणिक वाढतच चालला आहे. अशातच आता अमेरिकेच्या एका डॉक्टरांनी सुशांतच्या मृत्यू विषयी धक्कादायक खुलासा केला आहे.
सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या नसून हत्या आहे, असा दावा अमेरिकेतील इंटर्नल मेडिसिन डॉक्टरांनी केला आहे. अमेरिकेतील इंटर्नल मेडिसिन डॉक्टर राजू बाधवा यांनी सुशांतचा स्टन गणचा वापर करून हत्या केल्याचा दावा केला आहे.
सुशांतच्या प्रकरणात स्टन गणचा वापर झाला असल्याने, त्याच्या मानेच्या डाव्या बाजूला भाताजलेल्या खुणा आहेत. सुशांतचा अर्धा चेहरा पॅरेलाइज्ड दिसत होता. यामुळे सुशांतचा डाव डोळा उघडत नव्हता. याला बेल्स पल्सी असं म्हणता, असा दावा डॉक्टर राजू बाधवा यांनी ट्विटरवरून केला आहे.
राजू बाधवा यांच्या या थेअरीला भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी पाठिंबा दिला आहे. सुशांतच्या हत्येसाठी वापरण्यात आलेली गण अरबी सीमेलगतच्या कोणत्या देशातून पाठवली गेली होती?, याचा तपास एनबीआयने करायला हवा, असं सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
अंकिता आणि रियानंतर सुशांतच्या तिसऱ्या एक्स गर्लफ्रेंडविषयी धक्कादायक खुलासा
पुणेकरांनो सावध व्हा; ‘या’ पुलावरून जाणं तुमच्यासाठी ठरेल धोक्याचं
कोण आहे राधिका मेहता?; सुशांत मृत्युप्रकरणी ईडीचा धक्कादायक खुलासा!