मोठी बातमी! स्टार खेळाडू एबी डिव्हिलियर्सचा क्रिकेटला रामराम

नवी दिल्ली | दक्षिण आफ्रिकेचा स्टार खेळाडू एबी डिव्हिलियर्स यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घेतली होती. यातच त्यानं आणखी एक निर्णय घेत सध्या सगळ्यानाच मोठा धक्का दिला आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 360 डीग्री अशी ओळख असलेल्या एबी डिव्हिलियर्सने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली आहे. त्यानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याविषयी माहिती दिली आहे.

एबीडीच्या या निर्णयानं त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. एबीडीनं ट्विट करत चाहत्यांना ही माहिती दिली आहे.

हा अविश्वसनीय प्रवास होता. परंतु, मी सर्व क्रिकेटच्या प्रकारातून निवृत्ती घेतोय. मी माझ्या बॅकयार्डमध्ये माझ्या मोठ्या भावांसोबत क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली होती. तेव्हापासूनच मी पूर्ण आनंद आणि उत्साहासह हा खेळ खेळलो आहे, असं एबीडीनं ट्विट करत म्हटलं.

पुढे त्यानं म्हटलं की, आता 37 वर्षांच्या वयात मी त्याच फॉर्मात तेवढ्याच वेगानं खेळू शकत नाही. त्यामुळे आता 37 व्या वर्षी निवृत्ती घेत आहे.

दरम्यान, सर्वच प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. तो अखेरचे आयपीएल 2021  हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून खेळताना दिसला होता.

 

महत्त्वाच्या बातम्या – 

  थंडीत ऊन-पावसाचा खेळ; येत्या 3 दिवस ‘या’ भागात पडणार जोरदार पाऊस

  ‘मोदींनी आता ‘ही’ मागणीही मान्य करावी’; मोदींच्या घोषणेनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया

  ‘…तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही’; राकेश टिकैत यांची प्रतिक्रिया

  “आम्हीच कमी पडलो, कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या फायद्याचेच”

  मोदी सरकार अखेर झुकलं, केंद्र सरकार तीन कृषी कायदे रद्द करणार, नरेंद्र मोदींची घोषणा