“आम्हाला धक्का बसलाय, ही तर लाज वाटण्यासारखी गोष्ट”

मुंबई | आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन (Maharashtra Budget Session 2022) मुंबईत सुरू झालं आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपालाचं अभिभाषण चालू असताना सभागृहात आमदारांनी घोषणाबाजी करण्यास सुरू केली.

राज्यपाल कोश्यारींना अभिभाषण दोन मिनिटांत आटोपतं घ्यावं लागलं. त्यामुळे आता राज्यातील राजकारणात एकच वाद पेटला आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या आमदारांनी घोषणाबाजी केली. त्यामुळे राज्यपालांनी अभिभाषण उरकतं घेतलं.

या सर्व प्रकारावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी याच मुद्द्यावर खंत व्यक्त केली आहे.

ही लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे. यामुळे महाराष्ट्रचा अपमान झाल्याचं देखील आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

राज्यपालांनी असं निघून जाणं योग्य नाही. त्यांच्या भाषणावेळी त्यांचा अपमान होणं हे सर्व अयोग्य असल्याचं देखील त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

दरम्यान, घडलेल्या सर्व प्रकारामुळे आम्हाला धक्का बसलाय, असंही आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाव’, राज्यपालांविरोधात विरोधकांची जोरदार मोहिम

  ठाकरे सरकारला मोठा धक्का! ओबीसी आरक्षणाविषयी महत्त्वाची माहिती समोर