मद्यपींची चंगळ; सरकारने दिली 10 हजार रुपयांची दारु बाळगण्याची परवानगी

मुंबई |  विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य शासनाने मद्यपींना खुशखबर दिली आहे. 10 हजार रूपयांची दारू जवळ बाळगण्याची परवानगी सरकारने दिली आहे. सरकारच्या या निर्णयावर आता बऱ्याच चर्चा झडण्याची शक्यता आहे.

राज्य सरकारने घेतलेेल्या या निर्णयामुळे तळीरामांची आता चांगलीच चंगळ  होणार आहे. मद्यपींचे बिअर बार आणि वाईन शॉपमधील खेटे देखील कमी होणार आहेत.

तळीरामांना विदेशी मद्याच्या 12 बाटल्या बाळगत येणार आहे. बिअर आणि वाईनच्याही 12 बाटल्या जवळ बाळगता येणार आहे. एकाचवेळी 10 हजार रूपयांची दारू बाळगता येणार आहे, अशी मुभा राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाने दिली आहे.

सरकारच्या निर्णयानुसार एका व्यक्तीला देशी दारूचे 2 युनिट, बिअर आणि वाईनचे 12 युनिट, स्पिरीटचे 12 युनिट, ताडी आणि अकोल्होल असलेल्या द्रव्याचे देखील 12 युनिट बाळगता येणार आहे.

एकीकडे दारूबंदीची मागणी होत असताना शासनाने अधिकची दारू बाळगण्याची मुभा का दिली, हा प्रश्न अनुत्तरित आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे दारू माफिया फोफावणार का? असा प्रश्न लोक आता उपस्थित करू लागले आहेत.

महत्वाच्या बातम्या-