अजानसाठी लाऊड स्पीकरचा वापर बंद करावा- जावेद अख्तर

मुंबई |  मशीदीमध्ये अजानासाठी सऱ्हास लाऊड स्पीकरचा वापर केला जातो. अनेक वेळा आम्हाला लाऊडस्पीकरचा त्रास होतोय, त्यामुळे अजानसाठी लाऊड स्पीकरचा वापर बंद करावा, अशी मागणी झालेली आहे. हीच मागणी आपल्या स्पष्ट भूमिकांसाठी प्रसिद्ध असणारे गीतकार जावेद अख्तर यांनी केली आहे.

भारतात 50 वर्षांहून अधिक काळलाऊड स्पीकरवर अजान म्हणणं हराम होतं पण अचानक ते हलाल झाले आणि अश्या प्रकारे झाले की त्याला कोणतीच सीमा राहिली नाही. अजान ही वाईट नाहीये पण लाऊडस्पीकरचा वापर केल्याने इतरांना देखील त्याचा त्रास होतो, असं जावेद अख्तर म्हणाले आहेत.

इतक्या  दिवसांपासून अजानसाठी सुरू असलेला लाऊडस्पीकरचा वापर आता थांबेल, अशी मला आशा असल्याचं जावेद अख्तर यांनी सांगितलं आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विट करून आपली भूमिका मांडली आहे.

दुसरीकडे, अख्तर यांनी अजानसाठी लाऊड स्पीकरचा वापर बंद करावा, अशी मागणी केल्याने ते  प्रचंड मोठ्या प्रमाणात ट्रोल झाले आहेत. आपण कसे धर्मनिरपेक्ष आहोत हे सिद्ध करण्यासाठी अशी मागणी करण्याची गरज नव्हती, असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे तर गणेश उत्सवात तसंच हिंदूंच्या विविध धार्मिक सण उत्सवात देखील लाऊड स्पीकरचा वापर होतो मग तो ही बंद करा, असं ट्विट एका नेटकऱ्याने केलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-राज्यातला कोरोनाबाधितांचा आकडा 20 हजार पार… मात्र दिलासादायक बाब म्हणजे 3800 बरे होऊन घरी!

-“पालघर हत्याप्रकरणाची चौकशी सीआयडीकडून काढून सीबीआयकडे द्यावी”

-अमित शहांच्या तब्येतीविषयी अफवा पसरवणाऱ्या चौघांना गुजरातमध्ये अटक

-मे महिन्याअखेरीस पुण्यातील रुग्णसंख्या 10 हजारावर पोहोचण्याचा अंदाज- आयुक्त शेखर गायकवाड

-दिग्गजांना बाजूला सारत विधानपरिषदेसाठी काँग्रेसकडून ‘या’ युवा नेत्याला संधी