केरळनंतर राजस्थानमध्ये माणुसकीला काळीमा; उंटासोबत केलं काळजाचा थरकाप उडवणारं कृत्य

जयपूर |  हत्तीणीला स्फोटक खायला घालून मारल्याची घटना नुकतीच केरळमधून समोर आली होती. संपूर्ण देशभरातून या घटनेविरुद्ध संताप व्यक्त केला गेला. केरळ पाठोपाठ आता राजस्थान मधूनही अशीच अमानुष घटना समोर आली आहे.

राजस्थानमधील साजनसर या गावात चार वर्षीय मादा उंट शेतात घुसल्यामुळे तिघांनी उंटावर कुऱ्हाडीने वार केले आहेत. या हल्ल्यात उंटाचा एक पाय शरीरापासून वेगळा झाला आहे. योग्यवेळी गावातील गौशाळेत उपचार मिळाल्यामुळे उंटाचा जीव वाचला आहे.

गावातील ओमप्रकाश सिंह यांनी आरोपींविरोधात तक्रार दाखल केली आहे. ओमप्रकाश यांनी सांगितले की, ते आणि नोपाराम जाट गावातील रोहिमध्ये गुरे चारण्यासाठी गेले होते. तेव्हा एक उंट पळताना दिसली आणि त्याच्यामागे आरोपी पळताना दिसले.

आरोपींच्या हातामध्ये कुऱ्हाड होती. या तिघांनी उंटावर कुऱ्हाडीने वार केले. त्यांना थांबवण्यासाठी गेल्यावर त्यांनी ओमप्रकाश यांनाच जीवे मारण्याची धमकी दिली. पन्नाराम, गोपीराम आणि लीछुराम अशी आरोपींची नावे आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

चीनमध्ये तयार होतोय कोरोनापेक्षा खतरनाक व्हायरस; शास्त्रज्ञांचा धक्कादायक इशारा

पुणेकरांनो सावधान!; रुग्णालयांबाबत समोर आली अत्यंत धक्कादायक बाब

रुग्णालयात ‘या’ व्यक्तीच्या आठवणीने अमिताभ बच्चन व्याकूळ; शेअर केली कविता

भारत करतोय युद्धाची तयारी? ‘या’ देशाला चोख प्रत्युत्तर देण्याची तयारी सुरु

9 दिवसात होत्याचं नव्हतं झालं; तीन सख्ख्या भावांना कोरोनानं एकापाठोपाठ एक नेलं!