साहेब, हेल्मेट तुटलंय, पैसे संपलेत मला पकडू नका; पुणे पोलिसांनी दिलं भन्नाट उत्तर

पुणे | तेजस येवटेकर या विद्यार्थ्याने पुणे पोलिसांना टॅग करत एक ट्वीट केलं होते. माझं हेल्मेट तुटलं असून, नवीन हेल्मेट विकत घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत. त्यामुळे ट्रॅफिक पोलिसांनी मला पकडू नये, असं तो यात म्हणाला होता. यावर पुणे पोलिसांनी विद्यार्थ्याला भन्नाट उत्तर दिलं आहे.

‘रोझ डे’ दिवसाच्या निमित्ताने आम्ही एक अपवाद करत आहोत. आम्ही तुला एक भेट देणार आहोत, यावरुन आम्ही तुझ्या सुरक्षेची किती काळजी घेतो हे कळेल. तुझं नवीन हेल्मेट सोमवारी कमीशनर ऑफिसमध्ये तुला मिळेल, असं पुणे पोलिसांनी म्हटलं आहे.

तेजस या तरुणाने आपली व्यथा पोलिसांना सांगितली होती. मी घसरुन पडल्याने माझे हेल्मेट तुटले. मी विद्यार्थी आहे आणि या महिन्याचं माझं बजेट संपलं आहे. त्यामुळे नवीन हेल्मेट घेण्यासाठी मला पुढील महिन्याची वाट पाहावी लागेल. त्यामुळे पोलिसांनी मला पकडू नये, असं त्याने म्हटलं होतं.

दरम्यान, पुणे पोलीस आणि पुणे ट्रॅफिक पोलीस ट्वीटर हॅन्डलवर चांगलेच सक्रीय असतात. त्यांनी याआधीही असेच मजेशीर ट्वीट केले आहेत.

 

महत्वाच्या बातम्या

-52 वर्ष, सलग 14 वेळा तुम्ही मला निवडून दिलं…; आळंदीच्या कार्यक्रमात शरद पवार भावूक

-शरद पवारांनी तरुणाला विमानातून दाखवला चाकण अन् मगरपट्टा; मराठवाड्याच्या तरूणाला झालं आभाळ ठेंगणं

-… म्हणून संभाजी भिडेंना अटक होण्याची शक्यता

-“अंगाऱ्या धुपाऱ्याने मंत्री झालेल्या पाटलांचं पद दोन चार महिन्यात जाणार”