“अफवा आणि गैरसमज कुठल्या थरापर्यंत जाऊ शकतात याच उदाहरण म्हणजे पालघरची घटना”

मुंबई | पालघर झुंडबळीची घटना अस्वस्थ करणारी आहे, असं ट्विट अभिनेता सुबोध भावे याने केलं. असं पुन्हा कुठेच घडू नये म्हणून आपण सर्वांनी सिद्ध राहायला हवं, असं आवाहनसुद्धा त्याने केलंय.

पालघरमधील एका गावात लोकांनी तीन साधूंना ठार मारल्याची घटना घडली होती. त्यानंतर दोन दिवसांनी त्या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर या प्रकरणी कारवाईला सुरूवात करण्यात आली आहे. या घटनेविरोधात सर्वच स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

अफवा आणि गैरसमज कुठल्या थरापर्यंत जातात याचं उदाहरण म्हणजे पालघरची घटना. जीव गमवावा लागलेल्या जीवांना भावपूर्ण श्रद्धांजली. जमावाला विचार नसतो आणि कृतीला दिशा नसते हे पुन्हा सिद्ध झालं. असं पुन्हा कुठेच घडू नये म्हणून आपण सर्वांनी सिद्ध राहायला हवं, असं ट्विट सुबोध भावेने केलं आहे.

दरम्यान, पालघर प्रकरणात 100 पेक्षा जास्त लोकांना अटक केली आहे. यामध्ये नऊ मुलं अल्पवयीन आहेत त्यांना सुधारगृहात पाठवण्यात आलं आहे. तसंच या प्रकरणातल्या पाच म्होरक्यांनाही अटक केली आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

 

महत्वाच्या बातम्या-

-योगी आदित्यनाथ यांच्या वडिलांचं निधन; लॉकडाऊनमुळे अंत्यसंस्काराला न जाण्याचा निर्णय

-टांगे भी प्रोटेक्ट हो, नहीं तो व्हायरस निचे से आ जाएगा; पाकिस्तानी मंत्र्याचं अजब वक्तव्य

-पालघर घटनेनंतर उद्धव ठाकरेंना गृहमंत्रीअमित शहांचा फोन; म्हणाले…

-पालघर हत्याकांड प्रकरणी योगी आदित्यनाथांचा मुख्यमंत्र्यानां फोन म्हणाले…

-पालघर प्रकरणी सोशल मीडियावरुन आग लावणाऱ्यांना शोधून काढणार- उद्धव ठाकरे