“सत्तेसाठी उपाशी असलेल्या काँग्रेसवर जे ताटात आलं ते गोड मानायची वेळ आली”

मुंबई | ठाकरे सरकारचं खातेवाटप अखेर झालं आहे. खातेवाटपावरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये नाराजी असल्याचं वृत्त  येत होते. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

सत्तेसाठी उपाशी असलेल्या काँग्रेसवर जे ताटात आलं ते गोड मानायची वेळ आली, असं खातेवाटपावरुन दिसत आहे, असं म्हणत त्यांनी निशाणा साधला आहे. खातेवाटपात काँग्रेसच्या वाट्याला काहीशी कमी महत्वाची खाती आली आहेत. यावरुन मुनगंटीवारांनी हा टोला लगावला आहे.

ग्रामीण भागाशी थेट संबंध येईल अशी खाती मिळावी अशी काँग्रेसची मागणी होती. त्यामुळे ठाकरे सरकारच्या खातेवाटपाला उशीर झाल्याचं सांगितलं जात आहे.

खातेवाटपात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अनेकांना चकवा दिल्याचंही मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. गृहखातं आमच्या विदर्भात अनिल देशमुखांना देण्यात आलं तर छगन भुजबळांसारख्या मोठ्या नेत्याला आणखी वजनदार खातं मिळण्याची अपेक्षा होती, असं ते म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-