मुनगंटीवारांची पुन्हा शिवसेनेला प्रेमाची हाक; ‘तू यार है किसी और का’ म्हणत सेनेला प्रस्ताव!

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकार स्थापन होऊन 2 महिने झाल्यानंतर ‘सामना’ला विशेष मुलाखत दिली आहे. संजय राऊत यांनी उद्धव यांना विविध मुद्द्यांवर बोलतं केलं. या मुलाखतीनंतर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव यांची भाजपवर नाराजी नाही तर तक्रार आहे, असं म्हणत शिवसेनेला पुन्हा एकदा प्रेमाची हाक घातली आहे.

1989 पासून 2014 चा अपवाद सोडला तर भाजप आणि शिवसेनेची गेली 30 वर्ष युती होती. शिवसेना आणि भाजपने नेहमी विचारांवर आणि विचारांसाठी काम केलं. ‘एक विचार एक सूर’ हे या युतीचं वैशिष्ट होतं. दरम्यानच्या काळात काही घटना घडल्या. पण उद्धव ठाकरेंच्या एकूण मुलाखतीचा सार काढला तर तो ‘तू यार है किसी और का… तुझे चाहता किसी और हैं…, असाच निघतो, असं मुनगंटीवार म्हणाले.

याअगोदरदेखील शिवसेनेने भाजपला टाळी दिली किंवा सत्तास्थापनेचा प्रस्ताव दिल्यास आणखीही काहीही होऊ शकतं. किंबहुना भाजप सेनेचा विचार करायला तयार आहे, असं मुनगंटीवार म्हणाले होते.

भाजप आणि सेना कार्यकर्त्यांचा आणखीही स्नेह आहे आणि उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीतून दोन्ही पक्षांमध्ये देखील तो स्नेह असल्याचं अधोरेकित होतंय, असं मुनगंटीवार म्हणाले. उद्धव ठाकरेंना कुणी शब्द दिला असेल तर तो शब्द पाळला पाहिजे पण नसेल दिला तर तसं सारखं सारखं म्हणणं पण काही कामाचं नाही, असंही ते सांगायला विसरले नाहीत.

महत्त्वाच्या बातम्या-

-उदयनराजेंची पुढची राजकीय दिशा भाजपने ठरवली; घेतला हा मोठा निर्णय!

-दिल्ली बदलायची असेल तर आमच्या हातात सत्ता द्या- नरेंद्र मोदी

-मुख्यमंत्र्यांनी सामनाला दिलेली मुलाखत म्हणजे घरगुती आणि बालिश; राणेंची बोचरी टीका

-अरविंद केजरीवाल हे दहशतवादी आहेत… तसे पुरावे आमच्याकडे आहेत- प्रकाश जावडेकर

-“ह्या डांबर चोरात किती हिम्मत आहे ते आम्हाला माहीतय, कुठे यायचं सांगा फक्त”