एकनाथ खडसे राष्ट्रवादीत येणार असतील तर त्यांचं स्वागतच- सुनिल तटकरे

मुंबई | वेळोवेळी डावलले गेल्याने भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पक्षावर नाराज आहेत. गोपीनाथगडावर आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात खडसेंनी भाजप नेतृत्तावर टीका केली होती. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार  सुनिस तटकरे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

एकनाथ खडसे राष्ट्रवादीत आले तर स्वागतच आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा राष्ट्रवादीला मिळेल. त्यांच्या मागे मोठा समाज आहे. ते कोणत्याही पक्षात गेले तरी फायदा होईल, असं तटकरे म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा होऊ लागल्या आहेत.

हे खरंय, नागपूरच्या अधिवेशनात भूकंप होत असतात. नागपूर अधिवेशनात खडसे निर्णय घेतील असं वाटतंय, असं सूचक वक्तव्यही तटकरे यांनी केलं आहे. त्यामुळे येत्या काळात खडसे मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

दरम्यान, खडसे यांना पक्षाने वेळोवेळी डावलले आहे. त्यांना विधानसभेची उमेदवारी नाकारण्यात आली होती. तसेच त्यांच्या जागी त्याच्या मुलीला उमेदवारी देण्यात आली. मात्र, त्यांचाही पराभव झाला होता.

महत्त्वाच्या बातम्या-