….तो तर पंतप्रधानांच्या मनाचा मोठेपणा- सुप्रिया सुळे

मुंबई | शरद पवार यांनी एबीपीला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एकत्र काम करण्याचा प्रस्ताव ठेवला होता, पण आपण तो नाकारला असल्याचा खुलासा केला होता, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी सांगितलं. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मी त्या बैठकीत नव्हते. ही दोन मोठ्या नेत्यांमधील बैठक होती. जर त्यांनी ऑफर केली असेल तर हा पंतप्रधानांच्या मनाचा मोठेपणा आहे. विचारसरणी वेगळी असली तरी महाराष्ट्रात वैयक्तिक संबंध जास्त महत्त्वाचे आहेत, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं आहे.

शरद पवार फक्त माझे वडील नाहीत तर बॉसही आहेत, आणि बॉस हा नेहमी बरोबर असतो, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. अजित पवार यांनी भाजपला समर्थन देत पुन्हा स्वगृही परतण्यासंबंधी विचारलं त्यावर सुप्रिया सुळे प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवारांसंबंधी पक्ष निर्णय घेईल, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं आहे.

जर कुटुंबाने एकमेकाला पाठिंबा दिला नाही तर कोण देणार ? ते एक वाईट स्वप्न होतं. जेव्हा तुम्ही डोळे उघडता तेव्हा स्वप्न संपलेलं असतं, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या-