‘वरुण, सिद्धार्थपेक्षा सुशांतचं भविष्य उज्वल असेल’; इम्रान हाश्मीचा ‘तो’ व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला पाच दिवस उलटून गेल्यानंतरही सुशांतचे चाहते अजून या धक्क्यामधून पूर्णपणे सावरु शकलेले नाहीत. सुशांतच्या मृत्यूनंतर अनेकांनी सोशल मीडियावर बॉलिवूडमधील घराणेशाहीविरोधात आवाज उठवला आहे. अशात अभिनेता इम्रान हाश्मीचा ‘कॉफी विथ करण’मधील एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सुशांतबद्दल इम्रान हाश्मीने व्यक्त केलेलं मत आता व्हायरल होताना दिसत आहे. महेश भट्ट आणि इम्रान करणच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यावेळी करणने इम्रानला एक प्रश्न विचारला. यापैकी कोणत्या कलाकाराचं भविष्य जास्त उज्वल आहे असं तुला वाटतं?, असा प्रश्न करणने विचारला. त्याने या प्रश्नासाठी सुशांत सिंह राजपूत, वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा, अर्जुन कपूर, आयुष्मान खुराना, आदित्य रॉय कपूर असे सहा पर्याय दिले होते.

करणने पर्याय सांगू झाल्यानंतर पुढच्या क्षणाला इम्रानने सुशांतचे नाव घेतलं होतं. त्या खालोखाल वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्राला संधी आहे असंही इम्रान म्हणाला होता. हा व्हीडिओ आता व्हायरल होताना दिसत आहे.

ही मुलाखत 2014 सालातील असून त्यावेळी नुकतचं सुशांतने मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. 2013 साली सुशांतने काय पो छे! या चित्रपटातून आपल्या बॉलिवूडमधील प्रवासाला सुरुवात केली होती.

 

महत्वाच्या बातम्या-

-रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या खांद्यावर देण्यात आली ‘ही’ नवी जबाबदारी