तीन हजार मराठा आंदोलकांना दिलासा; मुख्यमंत्र्यांकडून गुन्हे मागे घेण्याची शिफारस

मुंबई | राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यापासून उद्धव ठाकरे यांनी मागील दहा दिवसात पाच प्रकरणांतील गुन्हे मागे घेण्याचे निर्णय घेतले आहेत. उद्धव ठाकरे यांनी स्थानिक न्यायालयातील मराठा आंदोलकांवर दाखल असलेले 288 गुन्हे रद्द करण्याची विनंती केली आहे.

ठाकरे सरकारच्या या निर्णयामुळे सुमारे तीन हजार आंदोलक युवकांना दिलासा मिळणार आहे. उद्धव ठाकरे यांनी आतापर्यंत मेट्रो कारशेड, नाणार प्रकल्प, कोरेगाव भीमा हिंसा, शेतकरी आंदोलन आणि मराठा क्रांती मोर्चातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची शिफारस केली आहे

मराठा आंदोलनाशी संबंधीत 35 खटले मागे घेतले जाऊ शकत नाहीत. कारण यामध्ये आंदोलनादरम्यान 5 लाख रुपयांच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे. तसेच काही प्रकरणांमध्ये पोलीस आणि सरकारी कर्मचारी जखमी झालं असल्याचं कळतंय.

दरम्यान, सरकारने गुन्हे रद्द करण्यासाठी पोलिस आयुक्तांद्वारे स्थानिक न्यायालयांना शिफारस केली आहे. यावर आता न्यायालय निर्णय घेणार आहे.

महत्वाच्या बातम्या-