‘ज्या अभिनेत्रींच्या हातावर थुंकतो ती…..’, आमिर खानचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

मुंबई| बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान नेहमीच कोणत्या न कोणत्या गोष्टींमुळे चर्चेचा विषय बनत  असतो. आमिर खान वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सेटवरील जुने किस्से सांगत असतो. अशातच आमिरनं नुकतच एका कार्यक्रमात जुना सांगितला असून त्याचा तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

करिअरच्या सुरुवातीस आमिरला एक विचित्र सवय होती. तो त्याच्यासोबत काम करणाऱ्या अभिनेत्रींच्या हातावर थुंकायचा. त्याच्या मते त्यानं असं कृत्य ज्या कुठल्या अभिनेत्रींसोबत केलंय त्या अभिनेत्री आज बॉलिवूडमधील सुपरस्टार झाल्या आहेत.

अभिनेता अमिर खानच्या ‘जो जिता वही सिकंदर’ या सिनेमाच्या निमित्ताने एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दिग्दर्शक फराह खान यांनी किस्सा सांगायला सुरवात केली. अमिर खान कोणत्याही अभिनेत्रीचा भविष्य सांगण्यासाठी हात हातात घेतो आणि त्या हातावर थुंकून पळून जातो, असा अजब किस्सा फराह खान यांनी सांगितला. तर हा आरोप अमिर खानने मान्य केला.

याविषयी बोलताना आमिर म्हणाला की, हे मी आजही करतो. दंगल चित्रपटाच्या वेळी मी अभिनेत्री फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा यांच्या हातावर थुंकलो होतो. पाहा आज ते सुपरस्टार आहेत. मी ज्या कुठल्या अभिनेत्रींच्या हातावर थुंकतो त्या सुपरस्टार होतात असा दावा आमिरनं केला. हा व्हिडीओ सध्या जोरजार व्हायरल होत आहे.

आमिरच्या या कृत्यावर अभिनेत्री जूही चावला चांगलीच नाराज झाली होती. ‘इश्क चित्रपटाच्या सेटवर सर्वांसमोर आमिरनं जुहीच्या हातावर थुंकलं होतं. आमिरचा राग आल्याने जुहीने दुसऱ्या दिवशी सिनेमाच्या शूटिंगला येण्यास नकार दिला. यावर आमिरलादेखील जूहिचा राग आला. या घटनेनंतर दोघेही काही वर्ष एकमेकांशी बोलले नाही. बऱ्याच वर्षांनी ते पुन्हा बोलू लागले.

दरम्यान, अभिनेता आमिर खानने रुपेरी पडद्यावर विविधरंगी भूमिका साकारत रसिकांची मने जिंकली. कोणत्याही भूमिकेला न्याय देण्यासाठी जीव ओतून अभिनय करणारा अभिनेता अशी आमिरची ओळख. एखाद्या भूमिकेला न्याय देण्यासाठी कितीही प्रयोग करावे लागले तरी आमिरने मागे पुढे पाहिलं नाही. त्यामुळे प्रत्येक भूमिकेत समरस होऊन जाणारा अभिनेता अशी ओळख आमिरने रसिकांच्या मनात निर्माण केली आहे.

 

महत्वाच्या बातम्या  – 

जाणून घ्या! भाजलेले फुटाणे खाण्याचे आरोग्यदायी फायदे

सीरम इन्स्टिट्यूटची दुसरी कोरोना लस नागरिकांसाठी सज्ज, आदर…

काय सांगता! 819 रुपयांचा सिलेंडर 719 रुपयांत मिळणार, जाणून…

वाहह! आता एका चाकाची इलेक्ट्रिक बाईक देखील रस्त्यावर धावणार, लूक देखील आहे अगदी भन्नाट

तरुणी उंटासोबत सेल्फी काढायला गेली अन् उंटाने केस धरून तिला…; पाहा व्हिडीओ