‘2022 च्या शेवटपर्यंत आपण….’; WHO चं मोठं वक्तव्य

नवी दिल्ली | कोरोनामुळे (Corona) मानवी जीवनावर भयंकर वाईट परिणाम झाला आहे. आतापर्यंत लाखो लोकांचा बळी घेणारा हा विषाणू आजही जगात आहे. भारतासह सर्वच देशांना आतापर्यंत कोरोना विषाणूची पहिली आणि दुसरी लाट आणि आता तिसरी लाट सहन करावी लागली आहे. यामुळे कोरोना कधी संपणार असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. या प्रश्नाचं उत्तर WHO नं दिलं आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) चीफ सायंटिस्ट सौम्या स्वामीनाथन यांनी जगाला मोठा इशारा दिला आहे. स्वामीनाथन यांनी ब्लूमबर्गशी बोलताना सांगितलं की, महासाथ संपल्याच्या अफवांवर विश्वास ठेवणं आपला मूर्खपणा असेल.

कोरोना महासाथ कधी संपणार? याचं उत्तर सध्या कोणाकडेच नाही. महासाथ संपल्याच्या अफवांवर विश्वास ठेवून अलर्टनेस कमी करणं आपला मूर्खपणा ठरेल, असं त्या म्हणाल्यात.

कोरोनाचा नवा वेरिएंट कधीही येऊ शकतो. आणि आपण पुन्हा त्याच परिस्थितीत अडकू शकतो. यासाठी आताच सावधान राहणं आवश्यक आहे. अशी आशा आहे की, 2022 च्या शेवटपर्यंत आम्ही योग्य स्थितीत येऊ, असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, देशातील प्राणघातक कोरोना व्हायरस साथीच्या रुग्णांची संख्या आता कमी होत आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोना व्हायरसचे 50 हजार 407 नवीन रुग्ण आढळले असून 804 जणांचा मृत्यू झाला आहे. काल 58 हजार 77 नवे रुग्ण आढळून आलेत. देशातील सकारात्मकता दर आता 3.48 वर गेला आहे.

सक्रिय प्रकरणांची संख्या 6 लाख 10 हजार 443 इतकी कमी झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आता देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 6 लाख 10 हजार 443 वर आली आहे.

या साथीमुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 7 हजार 981 झाली आहे. आकडेवारीनुसार, काल 1,36,962 लोक बरे झाले, त्यानंतर 4 कोटी 14 लाख 68 हजार 120 लोक संसर्गमुक्त झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या- 

कुख्यात गुंड गजा मारणे टोळीतील गुन्हेगारावर पोलिसांनी केली ‘ही’ मोठी कारवाई 

भारतीय गोलंदाजांवर पैशांचा पाऊस; वाचा कोणत्या गोलंदाजाला मिळाली किती रक्कम 

मुंबईने लावली महाबोली! IPL इतिहासातील सर्वात महागडा विकेटकिपर मुंबईच्या ताफ्यात दाखल

 ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांचं निधन, 83व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

तुमचं आयुष्य कमी तर होत नाही ना?, नॉनव्हेज खाणारांनो एकदा नक्की वाचा