बॅट्समननी असा बॉल मारला की तो डायरेक्ट टीव्हीतून आला बाहेर, पाहा अनोखा व्हिडीओ

नवी दिल्ली | भारत देशात असा एकही व्यक्ती नसेल, ज्याला क्रिकेट हा खेळ आवडत नाही. आपल्याला माहित आहे की, गल्ली-गल्लीत क्रिकेट हा खेळ खेळला जातो. लहानांपासून ते वृद्धापर्यंत सर्वांचाच क्रिकेट या खेळाच नाव जरी काढलं तरी त्यांचा उत्साह कुठच्या कुठे पोहचतो.

हल्ली सोशल मीडियावर क्रिकेटचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्याचप्रमाणे सोशल मीडियावर या खेळाबद्दल सतत काहीना काही बातम्याही व्हायरल होत असतात. अशातच भारताचा क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यानी नुकताच आपल्या कर्णधार पदाचा राजिनामा दिला असल्याचं समजतं आहे.

तसेच प्रसिद्ध उद्योजन आनंद महिंद्रा सतत आपल्या ट्विटर आकाऊंटवरून काहीना काही पोस्ट करतच असतात. सध्या त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे.

या व्हिडीओमध्ये काही लहान मुलं क्रिकेट खेळताना पाहायला मिळतं आहे. विशेष म्हणजे काही तीन-चार मुलं क्रिकेट खेळत आहेत आणि त्यांना पाहण्यासाठी काही मुलं त्यांच्यासमोर टिव्ही घेऊन बसली आहेत.

जेणेकरून ज्या प्रकारे आपण घरबसल्या कोणत्याही स्टेडीयम वरील सुरू असलेला क्रिकेटचा सामना पाहतो. तसाच फिल यावा यासाठी या लहान मुलांनी ही टिव्हीची युक्ती काढली असल्याचं समजतं आहे.

लहान मुलांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत जवळजवळ दोन लाख लोकांनी पाहिला असून, बऱ्याच जणांनी या व्हिडीओला कमेंटही केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

कुत्र्याशी पंगा घेण तरूणाला पडलं महागात, पाहा व्हायरल व्हिडीओ

चक्क कुत्र्याची आणि घोड्याची जमली मैत्री, पाहा व्हिडीओ

भल्या मोठ्या सापांशी खेळायला गेला तरूण अन्…, पाहा अंगाचा थरकाप करणारा व्हिडीओ

चक्क कुत्र्यानं वाचवलं चिमुकलीला पाण्यात बुडण्यापासून, पाहा व्हिडीओ

प्रिया वारियरच्या ‘या’ फोटोंनी चाहते घायाळ, पाहा व्हायरल फोटो