IPLच्या इतिहासातील सर्वात मोठी बोली!!! दक्षिण आफ्रिकेच्या ‘या’ खेळाडूवर लागली जबरदस्त बोली

चेन्नई | बहुप्रतिक्षित आयपीएल 2021 चा लिलाव चेन्नई मध्ये सुरु आहे. या लिलावाची सध्या क्रिकेट जगतात चांगलीच चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून बड्या क्रिकेटपटूंसोबत साऱ्या क्रीडाप्रेमींचं या लिलावाकडे लक्ष लागलं आहे. तब्बल 298 राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आपलं नशीब या लिलावात आजमावणार आहेत. या लिलावात दक्षिण आफ्रिकेच्या एका खेळाडूला लागलेल्या बोलीनं साऱ्यांचेच डोळे पांढरे झाले आहेत.

ख्रिस माॅरीसला राजस्थान राॅयल्सने विकत घेतलं आहे. त्याला 16 कोटी 25 लाख रुपयांची बोली लावण्यात आली आहे. ख्रिस माॅरीसची बोली 75 लाखा रुपयांपासून सुरु झाली होती. राजस्थान व मुंबई इंडियन्स या दोन संघांनी बोलीची सुरुवात केल्यानंतर राजस्थान व मुंबई इंडियन्सनेच ख्रिस माॅरीसची बोली पुढे नेली. शेवटी मुंबई इंडियन्सने माघार घेतल्याने राजस्थानने या बोलीत बाजी मारली.

ख्रिस माॅरीस 2015 मध्ये देखील राजस्थान राॅयल्सकडून खेळला होता. ख्रिस माॅरीस नंतर आॅस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेलला बोली लागली आहे. त्याला 14 कोटी 25 लाख रुपयांची बोली लावण्यात आली आहे. मॅक्सवेलची बोली 2 कोटी रुपयांपासून सुरु झाली होती.

ग्लेन मॅक्सवेलची कामगिरी म्हणावी तेवढी चांगली झालेली दिसत नाही. आयपीएलच्या गेल्या हंगामात तो पूर्णपणे अयशस्वी ठरला होता. पंजाबसाठी खेळताना त्याने 13 सामन्‍यात फक्‍त 108 धावा केल्या होत्या. धक्कादायक बाब त्याला एकही षटकार मारता आला नव्हता. पंजाबने त्याला 10.75 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं.

महत्वाच्या बातम्या –

IPL 2021 Auction | पंजाबच्या संघाचं नाव बदललं? के.एल.राहूलचा खुलासा म्हणाला…..

आनंदाची बातमी! 7,199 रुपयांचा ‘हा’ स्मार्टफोन फक्त 599 रुपयात, जाणून घ्या भन्नाट ऑफर

‘या’ अभिनेत्रीच्या आजीचा स्वॅग पाहून नेटकरी म्हणाले ‘लय भारी’; पाहा व्हिडीओ

जाणून घ्या बदाम खाण्याचे ‘हे आरोग्यदायी फायदे

गॅस सिलेंडरचा भ.डका! घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात तब्बल ‘इतक्या’ रुपयांची वाढ