सर्वात मोठी बातमी ! मुंबईत 29 ठिकाणी NIAची छापेमारी

मुंबई | मुंबईतून सर्वात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सकाळपासून मुंबईत एनआयएची छापेमारी सुरु आहे.

सकाळपासून एनआयएची नागपाडा, गोरेगाव, मुंब्रा, बोरिवली, सांताक्रूझ, भेंडी बाजार, अशा अनेक ठिकाणी छापे टाकल्याची माहिती मिळत आहे.

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याप्रकरणी तब्बल 29 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहे. या छापेमारीत पोलिसांनी काही जणांना अटक केली आहे.

एनआयए सातत्याने दाऊदशी संबंधित मालमत्तांवर कारवाई करताना दिसत आहे. त्यामुळे त्यांच्या संबंधीत, संशयीत मालमत्तांवर कारवाईचा सपाटा सुरु आहे.

मुंबईत पुन्हा दाऊद गॅंग सक्रिय झाली असून त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी आणि घातापात टाळण्यासाठी मुंबई पोलीस सतर्क झाली आहे.

देशातील काही प्रमुख व्यक्तींना इजा किंवा घातपात करण्याचा कट आखण्यात आल्याची माहिती एनआयएला मिळाली होती. याच पार्श्वभूमीवर ही कारवाई झाली.

मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईत अनेकांची चौकशी होणार आहे. त्यामुळे यामध्ये कोणाकोणाचं नाव समोर येतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

  मोठी बातमी ! राणा दाम्पत्यांविषयी महत्त्वाची माहिती आली समोर 

  Gold Rate: सोन्याच्या दरात मोठी वाढ, वाचा ताजे दर

  “माझी 99 टक्के संपत्ती वडिलोपार्जित, ती राज्य सरकारकडे जाहीरही केलीये”

कृष्णप्रकाश यांची संपत्ती किती?, अत्यंत महत्त्वाची माहिती समोर  

 ‘त्या’ लेटरबॉम्बवर कृष्णप्रकाश यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…