आत्ताची सर्वात मोठी बातमी! देवेंद्र फडणवीस पोलिसांच्या ताब्यात

मुंबई | राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर ईडीने अटकेची कारवाई केली होती. त्यानंतर मलिकांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती. त्यासाठी भाजपने आक्रमक पवित्रा घेत आंदोलन देखील केलं.

सध्या चालू असलेल्या विधीमंडळाच्या अधिवेशनात भाजपने नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी घोषणाबाजी केली होती. त्यानंतर आता आझाद मैदानात भाजपने आंदोलन चालू आहे.

अशातच आता नवाब मलिकांच्या अटकेसाठी आझाद मैदानात भाजपचे कार्यकर्ते जमले होते. त्यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, नितेश राणे, प्रसाद लाड, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना घटनास्थळावरून निघून जाण्याचं आव्हान केलं आहे. मात्र, मोर्चेकरी अजूनही घटनास्थळी अजूनही आंदोलन करताना दिसत आहेत. त्यामुळे पोलिसांनी मोर्चाच्या परिसरात बॅरिकेड्स लावून मोर्चेकऱ्यांना अडवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

आम्ही राजीनामा मागत नाही. अशा घटना रोज होत नाहीत. अशा घटना पाहिल्या तर राज्याला लाज वाटेल, असंही फडणवीस म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या- 

“महाविकास आघाडी सरकारला कुणीही धक्का लावू शकणार नाही” 

देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या आरोपांनंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले…’माझ्याकडे पण…’ 

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याकडून यलो अलर्ट जारी! 

“मुख्यमंत्री साहेब आता शेती परवडत नाही, वाईन विक्रीची परवानगी द्या” 

पुन्हा सत्तेत आल्यास योगी आदित्यनाथ इतिहास रचतील, जाणून घ्या सविस्तर